Municipal Corporation Election : राज्यातील 29 महापालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया आज (15 जानेवारी) सकाळपासून सुरु झाली असून संध्याकाळी 5.30 पर्यंत मतदान प्रक्रिया सुरु राहणार आहे. तर उद्या 16 जानेवारी रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याने कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
तर दुसरीकडे 8-9 वर्षांनंतर होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी (Municipal Corporation Election) राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार मतदान होताना दिसत आहे मात्र काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदान प्रक्रिया थांबली आहे. पुणे (Pune) , मुंबईसह (Mumabi) अनेक ठिकाणी ईव्हीएममध्ये (EVM) बिघाड झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यातील अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याने विरोध राज्य निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देखील या प्रकरणावरुन राज्य निवडणूक आयोगावर टीका केली आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यात अनेक ठिकाणी मतदानाची सुरवातच बंद मशीनने झाली, तर अनेक ठिकाणी EVM वरील वेळ सुमारे 15 मिनिटे उशिराची दाखवली जातेय, काही ठिकाणी तिसऱ्या उमेदवाराला मत दिल्याचं बटन दाबल्यानंतर लाईट लागते, काही ठिकाणी शेवटचं (चौथं) बटन दाबल्यानंतर आवाज येतो पण लाईट लागत नाही.. एकूणच हे सगळंच संशयास्पद आणि निवडणुकीबाबत अविश्वास निर्माण करणारं आहे. निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्टीकरण देऊन हा गोंधळ तातडीने दूर करावा आणि मतदान हे मुक्त व निर्भय वातावरणासह मत दिलेल्या उमेदवारांनाच ते गेलं पाहिजे, याची काळजी घ्यावी. असं आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.
29 महापालिकेत महायुतीचा महापौर असेल; भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा मोठा दावा-
पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यात अनेक ठिकाणी मतदानाची सुरवातच बंद मशीनने झाली, तर अनेक ठिकाणी EVM वरील वेळ सुमारे १५ मिनिटे उशिराची दाखवली जातेय, काही ठिकाणी तिसऱ्या उमेदवाराला मत दिल्याचं बटन दाबल्यानंतर लाईट लागते, काही ठिकाणी शेवटचं (चौथं) बटन दाबल्यानंतर आवाज येतो पण लाईट लागत…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 15, 2026
तर दुसरीकडे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक (Ganesh Naik) यांचेच नाव मतदार यादीतून गायब झाल्याने देखील रोहित पवार यांनी राज्य निवडणूक आयोगावर टीका केली आहे. वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी मतदान करणारे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक साहेब यांचं नाव मतदार यादीतून गायब आहे तर त्यांच्या कुटुंबातील तिघांची नावे तीन वेगवेगळ्या केंद्रावर आहेत. राज्याच्या एका कॅबिनेट मंत्र्यांनाच त्यांचं मतदान कुठं आहे हे माहित नसेल तर सामान्य लोकांना हे कसं कळणार? केवळ सत्तेतील एका पक्षाच्या सोयीसाठी वॉर्ड/प्रभाग रचनेपासूनच याची सुरवात झाली असून मतदारांचे चेहरे आणि आडनाव बघून त्यांना सोयीच्या प्रभागात टाकण्यात आलं. गणेश नाईक साहेब हे सत्तेत असूनही भाजपच्या रणनीतीची शिकार झाले आहेत. संपूर्ण राज्यात हीच अवस्था असून याबाबत निवडणूक आयोगाला जबाबदारी झटकता येणार नाही, उत्तर द्यावं लागेल..! असं रोहित पवार म्हणाले.
