MPSC Result : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून क्लार्क पदासाठी 2022 मध्ये 520 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामधून 272 उमेदवारांनी जॉईन केलं आहे. आणि 248 उमेदवारांनी नियुक्ती स्वीकारली नाही. (MPSC) त्यांची नियुक्ती सामान्य प्रशासन विभागामार्फत 16 एप्रिल रोजी रद्द करण्यात आली होती. ज्यांनी जॉइन केले नाही त्यांच्या जागी प्रतीक्षेत असणाऱ्या 248 उमेदवारांची प्रतीक्षा यादी मधील 155 उमेदवारांची नावे कालच्या यादीत जाहीर करण्यात आले आहेत.
कडू यांचा पाठपुरावा
आमदार बच्चू भाऊ कडू यांनी अनेक दिवसांपासून यासाठी पाठपुरावा केला होता. अखेर आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून कडून प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत घेण्यात आलेल्या महसुल सहायक/मंत्रालय लिपिक 2022 या पदाची 155 उमेदवारांची खूप दिवसांपासून अडकून होती. ही यादी प्रसिद्ध व्हावी यासाठी कडू यांनी अनेक दिवसांपासून प्रयत्न केले होते. आता ही यादी प्रसिद्ध झाल्याने 155 विद्यार्थ्यांना न्याय मिळाला आहे.