Download App

मारेकरी-पोलीस एकत्र; CCTV फुटेजमुळे वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात

Walmik Karad Video :  सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे (Santosh Deshmukh Murder Case) सध्या राज्यात राजकारण चांगलेच तापले आहे.

  • Written By: Last Updated:

Walmik Karad Video :  सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे (Santosh Deshmukh Murder Case) सध्या राज्यात राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपींविरोधात मकोका (MCOCA Act) अंतर्गत कारवाई देखील केली आहे. तर आता या प्रकरणात सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराडच्या (Walmik Karad) अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये वाल्मिक कराड, विष्णू चाटे (Vishnu Chate) आणि  सुदर्शन घुले (Sudarshan Ghule) एकत्र दिसत आहे. तसेच व्हायरल व्हिडीओ 29 नोव्हेंबरचा असल्याचा दावा देखील करण्यात आहे. त्यामुळे आता संतोष देशमुख हत्येचे संबंध आवादा कंपनीकडून (Avada Company) मागण्यात आलेल्या खंडणीशी जोडण्यात येत आहे. माहितीनुसार, 29 नोव्हेंबर रोजी विष्णु चाटे आणि वाल्मिक कराड यांच्याकडून आवादा कंपनीला खंडणी मागण्यात आली होती आणि याच दिवशी वल्मिक कराड विष्णू चाटेच्या कार्यालयमध्ये आला होता.

या व्हायरल व्हिडीओमध्ये वल्मिक कराडाबरोबर आरोपी प्रतीक घुले, सुदर्शन घुले आणि इतरजंण दिसत आहे. तसेच या व्हिडीओमध्ये निलंबित पीएसआय राजेश पाटील (PSI Rajesh Patil) देखील दिसून येत आहे. त्यामुळे आता या प्रकरणात राजेश पाटील यांची सीआयडी (CID) आणि एसआयटीकडून (SIT) चौकशी होण्याची शक्यता आहे.

तर दुसरीकडे व्हायरल व्हिडीओबाबत पोलिसांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमुळे खंडणी प्रकरणात आरोपी वाल्मिक कराडला जामीन मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. माहितीनुसार, वाल्मिक कराड याच्यावतीने विष्णू चाटे याने आवादा कंपनीकडे 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. मात्र कंपनीच्या अधिकाऱ्यांनी खंडणी देण्यास नकार दिल्याने विष्णू चाटे सहकाऱ्यांना घेऊन आवादा कंपनीत गेला होता. तिथे त्याचा तिकडे असणाऱ्या सुरक्षा रक्षकाशी वाद झाला होता.

स्टार प्लसवरील शो ‘पॉकेट में आसमान’ बद्दल फरमान हैदरने केला मोठा खुलासा, म्हणाला…

सुरक्षा रक्षक सरपंच संतोष देशमुख यांच्या मस्साजोग गावातील होता त्यामुळे संतोष देशमुख कंपनीत गेले होते आणि तिथे त्यांचा वाद विष्णू चाटेसोबत झाला होता आणि 9 डिसेंबर रोजी  संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. अशी माहिती समोर आली आहे.

follow us