Download App

कराडने नोव्हेंबर महिन्यातच दिली होती धमकी; संतोष देशमुखांच्या पत्नीच्या जबाबाने खळबळ

मस्साजोगचे संरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अखेर सात आरोपींविरोधात मोक्का दाखल करण्यात आला आहे.

  • Written By: Last Updated:

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात एक मोठी माहिती समोर आली असून, संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी सीआयडीला दिलेल्या पुरवणी जबाबात धक्कादायक खुलासा केला आहे. यात देशमुख यांच्या पत्नीने संतोष देशमुख यांना नोव्हेंबर महिन्यामध्येच वाल्मिक कराडने जीवे मारण्याची धमकी दिली होती, असं म्हटल्याचे सूत्रांच्या माहितीतून समोर येत आहे. यामुळे संतोष देशमुख अस्वस्थ होते. वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेकडून ही धमकी मिळाल्याची माहिती त्यांच्या पत्नीने दिली आहे.

नाव मागे घेतलं तर ठीक अन्यथा… सरकारने दंडासह वसुली ; भुजबळांचा लाडक्या बहि‍णींना इशारा

‘ते’ सुटले तर माझाही खून होईल 

सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा झाली पाहिजे. खंडणी ते खून हे प्रकरण सीआयडीने 31 डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीत स्पष्ट केलं होतं. त्यावरच आरोपीला पंधरा दिवसांचा पीसीआर दिला होता. जर या आरोपीला मोक्का आणि 302 खाली खूनाच्या आरोपाखाली न घेतल्याने आज (दि.13) संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख हे गावातील टाकीवर चढून आंदोलन करत आहेत. एवढेच नव्हे तर, माझ्या या भूमिकेमागे मोठं कारण आहे. जर हे आरोपी सोडले, तर ते उद्या माझा खून करतील. हे मला पण असेच निर्घृण मारतील. मग माझ्या कुटुंबात न्याय मागणारं कोणी नसेल. याशिवाय माझ्या भावाला पण बरं वाटेल, की हा अशा पद्धतीने मारला गेला नाही. त्यामुळे मी स्वत:चं संपतो, असं वक्तव्य धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी केलंय.

Video : ऐसा लगानेका अन् रात्रभर बांगो बांगो बांगो; धनुभाऊंचा फोटो दाखवत धसांचा नवा गौप्यस्फोट

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींविरोधात मोक्का

मस्साजोगचे संरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अखेर सात आरोपींविरोधात मोक्का दाखल करण्यात आला आहे. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, प्रतिक घुले, महेश केदार, कृष्णा आंधळे, सिद्धार्थ सोनावणे या सात जणांविरोधात मोक्का दाखल करण्यात आला आहे. (MCOCA) मात्र, यात या सर्व कारवाईत वाल्मिक कराडचे नाव घेण्यात आलेले नाही. संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये वाल्मिक कराड हा मुख्य मास्टरमाइंड असल्याचा आरोप होतो आहे. पण वाल्मिक कराडला सध्या खंडणीच्या गुन्ह्यात अटक झाली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्याला अटक झालेली नाही. म्हणून वाल्मिक कराडला मोक्का लावलेला नाही.

follow us