कुटुंब न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर पण प्रशासनाला लाज वाटत नाही, संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्योती मेटे आक्रमक

  • Written By: Published:
कुटुंब न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर पण प्रशासनाला लाज वाटत नाही, संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्योती मेटे आक्रमक

Jyoti Mete : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा या मागणीसाठी आज जालन्यात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्च्यात बोलताना  शिवसंग्राम पक्षाच्या ज्योती मेटे (Jyoti Mete) यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

यावेळी ज्योती मेटे म्हणाल्या की, गेल्या एका महिन्यापासून राज्यात आक्रोश पाहायला मिळत आहे. त्याला कारणीभूत आहे माणुसकी किंवा संवेदनशीलता हे शब्द जणू डिक्शनरीमधून हद्दपार झाले असतील अश्या पद्धतीने संतोष अण्णा (Santosh Deshmukh) यांची हत्या करण्यात आली आहे. आज खंत फक्त एकाच गोष्टीची वाटते की, या घटनेत न्यायासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावे लागले आहे. हे बीडमधल्या पोलीस प्रशासनाचे अपयश आहे.

संतोष देशमुख यांचे चिमुकली पोर न्याय मिळवण्यासाठी शिक्षण बाजूला ठेवून न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरले आहे मात्र याची प्रशासनाला लाज वाटत नाही. न्याय द्या असं म्हण्याची वेळ का? येत आहे. असा प्रश्न यावेळी ज्योती मेटे यांनी उपस्थित केला.

तसेच महाराष्ट्राला एक इतिहास आहे. चांगली परंपरा आहे मग कायदाच जरब या गुन्हेगारी प्रवृत्ती वर का राहिला नाही? त्याला कारणीभूत कोण आहे? याचा शोध सरकार घेणार का? असं देखील या मोर्च्यात ज्योती मेटे म्हणाल्या. तसेच बीड (Beed) आणि परभणीमध्ये आरोपींना कठोर कारवाई करण्यात यावी. कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली. तर दुसरीकडे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सध्या राज्यात राजकारण चांगलंच तापलं असून भाजप आमदार सुरेश धस यांनी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे आणि संयशित आरोपी वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप केले आहे.

तर दुसरीकडे मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी देखील मनोज जरांगे यांच्यावर या प्रकरणावरून जोरदार टीका केली आहे. तसेच 25 जानेवारीनंतर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर असणाऱ्या सर्व केसेसबद्दल खुलासा करणार असल्याचा इशारा देखील मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांना दिला आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात सीआयडीकडून चौकशी करण्यात येत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube