मित्रानेच केली ठाकरेंची कोंडी; औरंगजेबाच्या मजारीला दिली भेट

Prakash Aambedkar :  वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या मजारीला भेट दिली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे औरंगजेबाची मजार आहे. याठिकाणी येत आंबेडकरांनी औरंगजेबाच्या मजारीला भेट दिली. यामुळे आता नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. आंबेडकरांच्या या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाचे पोस्टर झळकावल्याने आणि औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्याने […]

Letsupp Image   2023 06 17T171653.869

Letsupp Image 2023 06 17T171653.869

Prakash Aambedkar :  वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या मजारीला भेट दिली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे औरंगजेबाची मजार आहे. याठिकाणी येत आंबेडकरांनी औरंगजेबाच्या मजारीला भेट दिली. यामुळे आता नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. आंबेडकरांच्या या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे.

गेल्या काही दिवसांपासून औरंगजेबाचे पोस्टर झळकावल्याने आणि औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्याने हिंदु संघटनांकडून भव्य मोर्चे काढण्यात आले होते. कोल्हापूर येथे एकाने औरंगजेबाचे स्टेटस ठेवल्याने हिंदु संघटनेकडून भव्य मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी या मोर्चाला हिंसक वळण देखील प्राप्त झाले होते. अशातच प्रकाश आंबेडकर यांनी ही भेट दिल्याने एकच चर्चा सुरु झाली आहे.

मुंबईत बेसिक गोष्टी मिळेनात अन् नाईट लाईफ… श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर घणाघात

यानंतर आंबेडकरांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. औरंगजेब 50 वर्षे राज्य करुन गेला ना? ते तुम्ही मिटवणार आहात का? औरंगजेबाचं राज्य का आलं? तर बाबासाहेबांनी सरळ सांगितलंय की, जयचंद इथे आले आणि साऱ्या राज्या-राज्यात झाले. त्या जयचंदाना शिव्या घालाना, त्या औरंगजेबाला कशाला शिव्या घालताय?, असे ते म्हणाले.

अमित शाहंपर्यंत गेलेला वाद… पडदा पडताच श्रीकांत शिंदेंनी ठरवला लोकल लेव्हलचा

तसेच या भेटीमुळे उद्धव ठाकरे यांची कोंडी होणार का? कारण त्यांनी सातत्याने औरंगजेबाला विरोध केला आहे, असा प्रश्न विचारला असता त्यांनी थेट उत्तर दिले. ते म्हणाले, अजिबात नाही. कारण सध्या वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांनी आपापसात युती केली आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या या भेटीनंतर ठाकरे गट अडचणीत येण्याची शक्यता आहे.

तसेच औरंगाबाद हे दुसरी राजधानी व्हावी हे तुघलकापासून आहे. लोकांचा सेकंड कॅपिटलला विरोध असेल तर माझं म्हणणं आहे, महाराष्ट्राने पुढाकार घ्यावा. सांगावं की, औरंगाबाद, खुलताबाद हा भाग भारताची दुसरी राजधानी म्हणून जाहीर करावी, असे आंबेडकर म्हणाले.

Exit mobile version