Maharashtra Rain Alert : राज्यात आता मान्सून पूर्णपणे सक्रिय झाल्याने अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. तर काही ठिकाणी रिमझिम पावसाची सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर आता पुढील दोन दिवसात राज्यातील अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच 6 जुलैनंतर राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याची देखील माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
हवामान विभागाचे अधिकारी एस.डी.सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या कोकण आणि घाटमाथा किनारपट्टीवर मुसळधार पावसासाठी पूरक परिस्थिती (Maharashtra Rain Alert) तयार झाली असल्याने राज्यातील काही भागात देखील याचा परिणाम जाणवणार आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद महाबळेश्वर येथे झाली आहे.
मुंबईसह कोकणात पुढील 3 दिवस मुसळधार पाऊस
तर दुसरीकडे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या मुंबई आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मान्सूनचे वारे वेगाने वाहत असल्याने पुढील दोन ते तीन दिवस मुंबई आणि कोकण परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे.
422 ग्रॅम सोने अन् 1.5 कोटींची कॅश ; अकोलाच्या लाचखोर जिल्हाधिकाऱ्याच्या घरात आणखी काय- काय? –
उद्या ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उद्या पालघर, ठाणे, रायगड, पुणे, सातारा या भागांसाठी मुसळधार पावसाची शक्यता असल्याने या रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आल्याने नागरिकांना आणि पर्यटकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
