Download App

Jitendra Avhad : तर राज्यपालांवर ही वेळ आली नसती? जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका

मुंबई : राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आपल्या अनेक विधानांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. यातच त्यांनी पदमुक्त होण्यासाठी मोदींना साकडे घातले आहे. आता याच प्रश्नावरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad)यांनी राज्यपालांना शाब्दिक टोला लगावला आहे.

तर राज्यपालांवर ही वेळ आली नसती
शिवरायांवरील वादग्रस्त वक्तव्यावरून राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे टीकेची धनी बनले आहे. यातच नुकतेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. राज्यपालांच्या या भूमिकेवर महाराष्ट्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. याच प्रकरणारून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांनी शाब्दिक टोला लगावला आहे. राज्यपालांनी बोलण्याआधी चिंतन मनन केलं असतं तर आज ही वेळ आली नसती, असं आव्हाड म्हणाले आहे.

पुढे बोलताना आव्हाड म्हणाले, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तेव्हा महात्मा फुलें बद्दल बोलले. त्यानंतर शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त बोलले. तेव्हा महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस चिडलेला होता. विरोधक एकटेच नव्हते पूर्ण महाराष्ट्रातल्या त्यांच्या भावना होत्या. पण महाराष्ट्रातील नागरिकांच्या भावनांची कधीही कदर झाली नाही, असे आव्हाड म्हणाले.

युतीबाबत आव्हाड म्हणाले…
सोमवारी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबडेकर यांची शिवशक्ती आणि भीमशक्ती यांची युती झाली. याबाबत आव्हाडांना विचारण्यात आले असता ते म्हणाले, मी त्या निर्णय प्रक्रियेतला माणूस नाही आहे. तसेच उध्दव ठाकरे यांनी जर मनात ठेवून युती केली असेल तरीही लाभदायक आहे. मात्र त्यांची कुणाशी काय चर्चा झाली हे माहीत नाही.

Tags

follow us