काय सांगता! राज्यातील धरण परिसरात दारूच्या पार्ट्यांना मुभा? सरकारचा निर्णय नेमका काय?

liquor at the dam area जलसंपदा विभागाकडून धरण क्षेत्रातील पर्यटनस्थळी मद्य विक्री आणि सेवनाला मुभा देण्यात आली आहे.

Liquor At Tourist Spots In The Dam Area

Liquor At Tourist Spots In The Dam Area

Water Resources Department allows sale and consumption of liquor at tourist spots in the dam area : राज्यामध्ये आता धरण क्षेत्रावर दारूच्या पार्ट्या रंगल्या तर आश्चर्य वाटायला नको. होय हे खर आहे. कारण आता राज्य सरकारनेच यासाठी परवानगी दिली आहे. प्रकरण नेमकं काय? तर राज्याच्या जलसंपदा विभागाने बुधवारी 8 ऑक्टोबर 2025 रोजी एक शासन निर्णय जाहीर केला आहे. ज्यामध्ये राज्यातील धरण क्षेत्रातील पर्यटन स्थळी मद्य विक्री आणि मद्य सेवनाला मुभा देण्यात आली आहे.

World Mental Health Day : लढाया शांततेत आणि सन्मानाने लढणं, हेच मला योग्य वाटतं – दीपिका पदुकोण

या निर्णयात नमूद करण्यात आल्याप्रमाणे धरणक्षेत्रावर मादक द्रव्यांची विक्री आणि सेवन केलं जाऊ शकतं. त्यामुळे आता राज्य सरकारच्या निर्णयामुळे सार्वजनिक ठिकाणी सर्रास दारूच्या पार्ट्या रंगण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान राज्यामध्ये जलसंपदा विभागांतर्गत 138 मोठे आणि 255 मध्यम तर 2862 लघु पाटबंधारे असे एकूण 3255 प्रकल्प आहेत.

जागतिक मानसिक आरोग्य दिन : जाणून घ्या कधी गंभीर होते? नैराश्याची समस्या…

यामधील बहुतांश प्रकल्प हे डोंगरदऱ्यांमध्ये निसर्गरम्य ठिकाणी आहेत. त्यामुळे पर्यटकांची येथे कायमच गर्दी असते. त्यातील काही धरण क्षेत्रालगत शासकीय विश्राम गृह देखील आहेत. दरम्यान या अगोदर धरण क्षेत्रालगत किंवा धरण क्षेत्रावर पर्यटक म्हणून किंवा इतरांना मादक पदार्थांची विक्री करणे आणि सेवन करणे यासाठी बंदी होती. असं आढळून आल्यास करारनामा रद्द करण्याची अट होती. मात्र ही अट आता शासनाने रद्द केली आहे.

राम चरणच्या ‘पेड्डी’चं नवीन शेड्यूल पुण्यात सुरू! ब्लॉकबस्टर गाण्याचं शूटिंग होणार

त्यामुळे आता राज्यातील कानाकोपऱ्यात असलेल्या धरण क्षेत्रावर दारूच्या पार्ट्या तसेच मादक द्रव्यांचे सेवन आणि विक्री होऊन होऊ शकते. ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. मात्र राज्य सरकारने ही परवानगी का दिली? यामागे अवैध मद्य विक्रीला आळा घालणे धरण क्षेत्रांचा विकास पर्यटनाच्या माध्यमातून करणे तसेच स्थानिक लोकांना रोजगार मिळवून देणे हा यामागील उद्देश आहे.

 

Exit mobile version