Download App

आम्हीही निवडणुकांसाठी तयार.., मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड

  • Written By: Last Updated:

मुंबई : आम्ही महापालिका निवडणुकांसाठी तयार असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलं आहे. राज्यात निवडणुका घेण्यावरुन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना कायमच धारेवर धरल्याचं दिसून येतंय, त्यावर आता मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना चॅलेंज दिलंय. मुंबईतील दादरच्या वीर सावरकर सभागृहात सुरु असलेल्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे बोलत होते.

मुख्यमंत्री शिंदे बोलताना म्हणाले की, काही लोक तर सर्वोच्च न्यायालयाला सल्ला देत आहेत. आधी हायकोर्टाला देतच होते. खरं तर निवडणुकांचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. कधीही निवडणुका घेण्यासाठी आम्ही तर तयार आहोत. हे चार-पाच महिन्यात एवढं करू शकतात. यांना संधी दिली तर काय करू शकतील, हे लोकांना कळून चुकलं असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटलंय.

WPL Auction 2023 : स्मृतीवर 3.40 कोटी तर हरमनप्रीतला 1.80 कोटींना ‘या’ टीमने घेतलं विकत

तसेच आम्ही सत्तेत आलो तेव्हा निवडणुका होत्या का? नव्हत्या. आम्ही डोळ्यासमोर निवडणुका ठेवत नाही. लोकं ठरवतात कोण कामाचं आणि कोण बिनकामाचा. पण आम्ही काम करत राहणार, असं त्यांनी स्पष्ट केलं.

शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे शिवसंवाद दौऱ्यावर असताना त्यांनी अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवडणुका घेण्याबाबत चॅलेंज दिलं होतं. फक्त महापालिकेचं नाहीतर आदित्य ठाकरे यांनी तुम्ही वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवा, माझं एकही मतं फूटणार नसल्याचा इशाराही दिला होता. तर दुसरीकडे आज उत्तर भारतीयांच्या बैठकीतही शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधत पुन्हा एकदा निवडणुका घेण्याबाबत त्यांनी आव्हान दिलं आहे.

Girish Mahajan : 2019 साली अनिल देशमुख भाजपमध्ये येणार होते, महाजनांचा खळबळजनक दावा

दरम्यान, विधानपरिषदेच्या निकालानंतर महाविकास आघाडीला आपण अनेक जागांवर आफलं वर्चस्व प्रस्थापित करु शकतो, असा दावा करण्यात येत असल्याचं दिसून येतंय. तर आम्ही निवडणुका घेण्यासाठी तयार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान केलंय.

एकंदरीत मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांचं चॅलेंजच स्वीकारलं असून आता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून त्यांच्या या वक्तव्यावर कोणती प्रतिक्रिया दिली जाते. हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us