WPL Auction 2023 : स्मृतीवर 3.40 कोटी तर हरमनप्रीतला 1.80 कोटींना ‘या’ टीमने घेतलं विकत

WPL Auction 2023 : स्मृतीवर 3.40 कोटी तर हरमनप्रीतला 1.80 कोटींना ‘या’ टीमने घेतलं विकत

Women’s IPL Auction 2023 : महिला प्रीमियर लीग २०२३ साठी मुंबईत झालेल्या लिलावाला सुरुवात झाली. (Womens IPL Aucion) या लिलावासाठी ४०९ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. त्यापैकी संघ जास्तीत जास्त ९० खेळाडूंना आपल्या संघात समाविष्ट करणार आहे. ( IPL Auction 2023 ) या लिलावात सर्वात पहिल्यांदा स्मृती मंधानाला बोली लागली. तर भारताची सलामीवीर स्मृती माधना (Smriti Mandhan) हिच्यावर मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यात रंगदार युद्ध रंगले. ५० लाखांच्या मूळ किंमतीनंतर दोघांनी या खेळाडूवर मोठी बोली लागली.

अखेर आरसीबीने त्याला ३.४० कोटी रुपयांना विकत घेतले. हरमनप्रीत कौरला मुंबई इंडियन्सने १.८ कोटी रुपयांना विकत घेतले. अशाप्रकारे टीम इंडियाची कर्णधार आणि आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेली हरमनप्रीत कौर (harmanpreet kaur) महिला आयपीएलच्या पहिल्या सत्रात मुंबई इंडियन्सच्या जर्सीमध्ये दिसणार आहे.

भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरला त्यांच्यासोबत सामील केले आहे. हरमनप्रीत कौरला मुंबई इंडियन्सने १.८ कोटी रुपयांना विकत घेतले. अशाप्रकारे टीम इंडियाची कर्णधार आणि आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेली हरमनप्रीत कौर महिला आयपीएलच्या पहिल्या सत्रात मुंबई इंडियन्सच्या जर्सीमध्ये दिसणार आहे. भारतीय टी-२० संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना महिला आयपीएलच्या पाचही फ्रँचायझींच्या रडारवर होती.

कारण ती अनेक भूमिका साकारू शकते. ती फलंदाजीबरोबरच कर्णधारपदही करू शकते. ती जगभरातील महिला क्रिकेट लीगमध्ये खेळली आहे. यामध्ये बिग बॅश आणि वूमन हंड्रेडचा समावेश आहे. ती टी-२० फॉरमॅटची दमदार खेळाडू आहे. गेल्या वर्षी वूमन हंड्रेडमध्ये २०० धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये मंधानाचा १५२ चा स्ट्राईक रेट हा दुसरा सर्वोत्तम ठरला. अशा परिस्थितीत लिलावात तिच्यावर पैशांचा पाऊस पडला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube