आमच्याकडे गुजरातची निरमा पावडर, गरज असेल त्याला स्वच्छ करून घेतो; भाजप आमदाराचे वादग्रस्त वक्त्यव्य

आमच्याकडे गुजरावरून आलेली निरमा पावडर आहे. गरज असेल तर आम्ही त्याला स्वच्छ करून घेतो, अशा स्वरूपाचं वक्तव्य भाजप आमदार रमेश पाटील यांनी केल्यामुळे राज्यभर पुन्हा एकदा निरमा पावडर ट्रेंडिगवर आली आहे. पण यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विधानसभेत टार्गेट केले. ठाकरे गटातील नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई […]

भाजपाचं पहिलं सरकार अन् पहिला पंतप्रधान; भाजपाच्या इतिहासातल्या गोष्टीही खास...

भाजपाचं पहिलं सरकार अन् पहिला पंतप्रधान; भाजपाच्या इतिहासातल्या गोष्टीही खास...

आमच्याकडे गुजरावरून आलेली निरमा पावडर आहे. गरज असेल तर आम्ही त्याला स्वच्छ करून घेतो, अशा स्वरूपाचं वक्तव्य भाजप आमदार रमेश पाटील यांनी केल्यामुळे राज्यभर पुन्हा एकदा निरमा पावडर ट्रेंडिगवर आली आहे. पण यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विधानसभेत टार्गेट केले.

ठाकरे गटातील नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावर तीन हजार कोटींचा घोटाळ्याचा आरोप असलेले देसाई पक्षात आल्यामुळे विरोधाकडून यावर प्रश्न उपस्थित केले, त्यावर विधान परिषदेत बोलताना भाजप आमदार रमेश पाटील यांनी धक्कादायक वक्तव्य केले. त्यावरून आज अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना सावध राहा, असा सल्ला दिल्यामुळे मोठी चर्चा झाली.

फडणवीसांचा शब्द पाण्यात, अजितदादांनी भातखळकरांना फटकारले..

नक्की काय म्हणाले रमेश पाटील?

काल विधानपरिषदेत एका चर्चेत बोलताना रमेश पाटील म्हणाले की, “भूषण देसाई नुकतेच शिवसेनेत आलेत. त्यांची चारशे कोटींची ‘एमआयडीसी’च्या प्लॉटची फाइल आहे. त्यामुळे ते आमच्याकडे आल्याचा आरोप विरोधकांनी केला. मात्र, त्यांना मी त्यांना एवढेच सांगू इच्छितो की, इथे न्याय मिळणार आहे, म्हणून ते आलेले आहेत. आमच्याकडे निरमा वॉशिंग पावडर आहे. ती गुजरावरून येथे आणली आहे. त्याच्यामुळे आम्ही साफसफाई करून आमच्याकडे जो माणूस येईल, तो माणूस स्वच्छ होणार आहे.”

राष्ट्रवादीकडून खोचक टोला

रमेश पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर विरोधी पक्षाकडून भाजपला घेरण्यात आलं आहे. आज अजित पवार यांनी यावरून टीका केलीच पण “भाजपच्या निवडून आलेल्या विधानसभेतील आमदारांनी विधान परिषदेत निवडून दिलेले भाजप आमदार रमेश पाटील यांनी मुक्ताफळे उधळून भाजप वॉशिंग मशीनचा खरा चेहरा उघड केला. मा. सभापती यांना विनंती की हे सत्य कथन सभागृहाच्या कामकाजातून वगळण्यात येऊ नये.” अशी टीका राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. सोबत सबकी (भ्रष्टजनों की) पसंद ‘निरमा’ (BJP) अशा टोला देखील लगावला आहे.

‘हा अजित पवार उपमुख्यमंत्री म्हणून…” अजित पवार संतापले; मुख्यमंत्री शिंदे धावत सभागृहात

Exit mobile version