फडणवीसांचा शब्द पाण्यात, अजितदादांनी भातखळकरांना फटकारले..

फडणवीसांचा शब्द पाण्यात, अजितदादांनी भातखळकरांना फटकारले..

Ajit Pawar : विधिमंडळ अधिवेशनात आज पुन्हा एकदा मंत्र्यांच्या गैरहजेरीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार खडाजंगी झाली. विशेष म्हणजे, खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना आश्वासन दिल्यानंतरही मंत्री सभागृहात उपस्थित नव्हते. इतकेच काय तर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) ठराव मांडत असताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह बरेचसे मंत्री हजर नव्हते. त्यावरून विरोधी पक्षातील नेत्यांचा चांगलाच संताप झाला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील, धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिल्यानंतर भाजपनेही उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) उपस्थितीचा मुद्दा मांडताच अजित पवारांना भाजप नेत्यांना चांगलेच फैलावर घेतले. विधिमंडळात अजित पवार ठराव मांडत असताना सत्ताधारी बाकांवर मंत्रीच हजर नसल्याचे धनंजय मुंडे यांनी निदर्शनास आणून दिले.

वाचा : Ajit Pawar : दांडीबहाद्दर मंत्र्यांमुळे अजितदादांचा संताप; म्हणाले, हा तर निर्लज्जपणाचा कळस.. 

‘जेव्हा विरोधी पक्षनेते 293 चा ठराव मांडतात, तेव्हा किमान मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी थांबायला हवे. आता इथे फक्त सहकारमंत्री आहेत. हे अत्यंत चुकीचे आहे. अशा प्रकार विरोधी पक्षनेत्यांसहीत विरोधी बाकांवरच्या सदस्यांचा अपमान होत असेल तर इथे विरोधी पक्षांनी कशासाठी बोलायचे ?, सरकारला याचे काहीच गांभीर्य नाही, असे मुंडे म्हणाले. यानंतर विरोधी बाकांवरच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. अजित पवार व त्यानंतर जयंत पाटील यांनी सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली.

‘विरोधी पक्षनेते ज्यावेळी बोलतात त्यावेळी सभागृहाचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात हजर रहायला हवे. इतकेही जर लक्षात येत नसेल तर आम्ही शांत बसतो. कसं वागायचं ते तुम्हीच ठरवा. त्यांनी किमान खेद तरी व्यक्त करा गैरहजर होते म्हणून,’ असे पाटील म्हणाले.

जयंत पाटील म्हणाले, सर्व मार्गानं चिरडायचा कार्यक्रम होतोय

यानंतर सत्ताधारी गटातील आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी तुमचे मुख्यमंत्री अडीच वर्षे कुठे उपस्थित होते ?, असा प्रश्न विचारला. यावर मात्र अजित पवार यांचा पारा चढला. ते म्हणाले, ‘अतुलजी, तुम्ही नीट आठवा. सभागृहात जेव्हा गरज असायची, तेव्हा ते असायचेच. पण उपमुख्यमंत्री म्हणून हा अजित पवार सकाळी 9 वाजल्यापासून हजर असायचा. मी तुम्हाला प्रत्येकाला आदर द्यायचो, प्रत्येकाला सन्मानाने सकारात्मक उत्तरेही द्यायचो,’ असे पवार म्हणाले.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube