Download App

Weather Forecast : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा विदर्भात गारपिटीचा इशारा, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

आता पुन्हा एकदा हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश ठिकाणी गारपीटीचा इशारा दिला आहे.

Weather Forecast : मान्सूनपूर्व पावसाच्या (Pre-monsoon rains) सरींनी हजेरी लावल्याने राज्यात उन्हाचा चटका कमी झाला. काल अनेक ठिकाणी पाऊस झाल्यानंतर आता पुन्हा एकदा हवामान खात्याने (IMD) राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. हवामान खात्याने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश ठिकाणी गारपीटीचा इशारा दिला आहे.

Ruchira Jadhav : रुचिरा जाधवने खरेदी केली नवी आलिशान कार… 

सोमवारी दुपारनंतर अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार असा हवामान खात्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सोमवारी पुणे, नगर, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुसळधार अवकाळी पाऊस पडेल.

याशिवाय नंदुरबार, जळगाव आणि बीड जिल्ह्यातही तुफान पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यात गारपिटीचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. आयएमडीने काही राज्यातील पुणे, मावळ, शिरूर, नगर, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांनाला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर नंदुरबार, जळगाव, रावेर आणि बीड जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे मतदारांनी सकाळच्या सत्रात मतदानास प्राधान्य द्यावे, असं आवाहन करण्यात आले आहे.

Horoscope Today : आजचे राशी भविष्य, नोकरीच्या ठिकाणी तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल 

गेल्या तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात काही ठिकाणी हलका तर कुठे मुसळधार पाऊस पडत आहे. आजही पावसाची शक्यता वर्तवली असून पुढील चार ते पाच दिवस राज्यात अशीच पावसाची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.

वादळ, गारपिटीचा इशारा. (ऑरेंज अलर्ट)
नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ.

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट)
राज्यात ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सोलापूर तसेच परभणी, बीड, लातूर, नांदेड, धाराशिव, अकोला, अमरावती, बुलडाणा, नागपूर, वाशीम, वर्धा, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला.

follow us