Download App

Weather Update : पुढील 24 तास महत्वाचे; ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अलर्ट

Weather Update : देशभरातून मान्सूनच्या परतीचा प्रवास (Weather Update) सुरू झाला आहे. तरीही महाराष्ट्रात काही ठिकाणी अद्याप पावसाचा जोर कायम आहे. आताही हवामान विभागाने येत्या 24 तांसात मुसळधार पावसाचा इशारा  (Heavy Rain Alert) दिला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने अशी परिस्थिती सुरू झाली आहे. कोकण किनारपट्टीसह राज्यात अन्य भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 24 तासांत ठाणे, मुंबई उपनगरासह राज्यात आज पावसाची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.

“त्या’ सर्व भावी मुख्यमंत्र्यांना माझ्या शुभेच्छा” : देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कोणाकडे?

सध्या सर्वदूर परतीचा पाऊस सुरु (Weather Update) आहे. काही दिवसांपासून परतीच्या पावसाने ब्रेक न घेताच जोरदार बरसल्याचं दिसून आलं आहे. अशातच दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी जिल्ह्यााल पावसाने चांगलचं झोपडलं आहे. जिल्ह्यातील अनेक गावांना पुराने वेढा घातला असून पुढील दोन दिवसही धो-धो पाऊस बरसणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसही पावसाला सुट्टी नसल्याचंच दिसून येत आहे.

राज्यातील दक्षिण कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पुढील दोन दिवस धो-धो पाऊस बरसणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. सध्या अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळेच पुढील 2 दिवसांत पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाकडून जरी इशारा देण्यात आला असला तरीही रत्नागिरीमध्ये आज सकाळपासूनच पावसाच्या सरी बरसत असल्याचं पाहायला मिळत आहे.

रत्नागिरीला पावसाने झोडपलं! पुढील दोन दिवसही सुट्टी नाही; हवामान विभागाने सांगितलं

5 ऑक्टोबरनंतर पावसाचा जोर कमी होणार

दरम्यान, येत्या 5 ऑक्टोरनंतर राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण आणखी काही दिवस कायम राहिल. पण, पावसाची शक्यता कमी राहिल असे हवामान विभागाने सांगितले. ऑक्टोबर महिन्यात सर्वत्रच कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच या महिन्यातच मान्सून माघार घेणार आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने कोकणातील काही भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवर समुद्राच्या लाटा अति वेगाने येत असल्याने किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. कोकणातील जिल्ह्यात बारा तासांपेक्षा अधिक जोरदार पाऊस कोसळत होता.

Tags

follow us