Download App

Weather Update : तीन दिवस मुसळधार! ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट

Weather Update : ऑगस्ट महिना कोरडाच गेल्यानंतर सप्टेंबर महिन्यात चांगला (Weather Update) पाऊस होईल असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र, या महिन्यातील सुरुवातीचे तीन ते चार दिवस वगळता पाऊस (Rain) झालाच नाही. आता तर अर्धा सप्टेंबर महिना उलटला तरी देखील समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता पावसाचा आणखी एक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, पुढील तीन ते चार दिवसांत राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होईल. जर हा पाऊस झाला तर खरीप पिकांना मोठा दिलासा मिळेल.

पंडित नेहरूंनी सिगारेटसाठी भोपाळहून इंदौरला विमान पाठवले, मुनगंटीवारांचे पटोलेंना प्रत्युत्तर

तसे पाहिले तर मागील दोन दिवसांपासून अनेक ठिकाणी पावसाला (Weather Update) सुरुवात झाली आहे. अनेक जिल्ह्यात ढगाळ हवामान आहे तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस बरसत आहे. मुंबई, पुणे, कोकणात पावसाने कमबॅक केले. काल मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यांत पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. त्यानंतर आजही राज्यात पावसाचा अंदाज आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. शनिवारी विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांत पाऊस होईल. चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

विदर्भातील जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट

बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात (Weather Update) आला आहे. खानदेशातील जळगाव, धुळे, नंदूरबार जिल्ह्यात ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल असा अंदाज आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यात जोरदार पाऊस होईल असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

Sujay Vikhe : माविआने घरात बसून राज्य कारभार केला जायचा; विखेंच ठाकरेंवर टीकास्त्र

दरम्यान, मागील आठवड्यात राज्यातील पुणे, मुंबई, नाशिक या पट्ट्यात जोरदार पाऊस (Weather Update) झाला होता. नाशिक जिल्ह्याला तर पावसाने अक्षरशः झोडपून काढले होते. गोदावरी नदीची पाणी पातळीही मोठ्या प्रमाणात वाढली होती. यानंतर मात्र पावसाने पुन्हा दडी मारली आहे. उर्वरित सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस झाला नाही तर अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या पिकांनाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आजच्याच परिस्थितीत अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे.

Tags

follow us