Sujay Vikhe : माविआने घरात बसून राज्य कारभार केला जायचा; विखेंच ठाकरेंवर टीकास्त्र

Sujay Vikhe : माविआने घरात बसून राज्य कारभार केला जायचा; विखेंच ठाकरेंवर टीकास्त्र

Sujay Vikhe : 2019 च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्रित लढले, परंतु खुर्चीच्या हव्यासा पोटी गद्दारी करून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर सरकार आणले, या सरकारच्या कार्यकाळात घरून कारभार सुरू होता त्यामुळे आपले पुढारलेले राज्य हे दहा वर्षे मागे गेले अशा शब्दांत खासदार सुजय विखे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

Delhi : विशेष अधिवेशनापूर्वी दिल्लीत मोठ्या घडामोडी; केसीआर यांचे थेट PM मोदींना पत्र

तसेच देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा सर्वसामान्यांचे असे सरकार राज्यात आणले आणि अनेक वर्षाच्या कार्यकाळात सर्वांना न्याय देण्याचे काम शिंदे – फडणवीस आणि आता नव्याने सरकार मध्ये आलेलं अजित पवार हे करत आहेत, असे वक्तव्य खासदार विखे यांनी केले. राहुरी येथे दिव्यांगाच्या साधन साहित्य वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिक्षणमंत्री चंद्रशेखर यांचे वादग्रस्त वक्तव्य; म्हणाले, ‘रामचरितमानसमधील काही गोष्टी पोटॅशियम सायनाइडसारख्या’

यावेळी बोलताना ते म्हणाले की, गोर गरीब जनतेसाठी अहोरात्र राज्य आणि केंद्र सरकार काम करत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे तर आता विश्वाचे नेते झाले आहेत असे सांगून खा. विखे यांनी जी-20 परिषदेच्या यशस्वी आयोजनाचा संपूर्ण श्रेय हे मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिले. या आंतररष्ट्रीय परिषदेच्या यशस्वी आयोजन तून देशाच्या अर्थव्यवस्थेला खूप मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. देशाची अर्व्यवस्था ही आज जगाच्या तुलनेत पाचव्या स्थानावर आहे, ती तिसऱ्या स्थानावर नेण्याचे मोदी यांचे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी त्यांना पाठिंबा देणे गरजेचे असून तिसऱ्यांदा मोदीजी यांना आपल्याला पंतप्रधान करावयाचे असल्याचा निर्धार आपण सर्वांनी करावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले.

खुर्चीच्या हव्यासपोटी ठाकरेंनी गद्दारी केली

2019 च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्रित लढले, परंतु खुर्चीच्या हव्यासा पोटी गद्दारी करून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर सरकार आणले, या सरकारच्या कार्यकाळात घरून कारभार सुरू होता त्यामुळे आपले पुढारलेले राज्य हे दहा वर्षे मागे गेले, परंतु आपले नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा सर्वसामान्यांचे असे सरकार राज्यात आणले आणि यानेक वर्षाच्या कार्यकाळात सर्वांना न्याय देण्याचे काम शिंदे – फडणवीस आणि आता नव्याने सरकार मध्ये आलेलं अजित पवार हे करत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube