Maharashtra Weather Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal rain) धुमाकूळ घातला आहे. अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. तर काही भागात उष्णतेची लाट आहे. एप्रिल महिन्याच्या सुरूवातीपासून हवामानात सातत्याने बदल होत आहे. आजही राज्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. तर काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
नाबार्डमध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरू, महिन्याला १ लाख रुपये मिळणार पगार, कोण करू शकतं अर्ज?
आज प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
पुणे वेधशाळेकडून मिळालेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रातून वाफेचे उष्ण वारे किनाऱ्यावर येत असल्याने पुढील काही दिवस किनारपट्टी भागात तापमानात वाढ होणार आहे. आर्द्रता वाढल्यामुळे असह्य उष्ण हवामानाचा सामना करावा लागेल.
Israel attack on Gaza : गाझावर इस्त्रायलचे पुन्हा हल्ले, राफा शहरातवर केलेल्या हल्ल्यात 18 ठार
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, आज, उद्या आणि 24 एप्रिल रोजी राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 23 आणि 25 एप्रिल रोजी कोकण आणि गोवा वगळता इतर राज्यात पावसाची शक्यता आहे. कोकणात आजपासून पुढील पाच दिवस उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. आज मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याचीही शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात आज विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहतील. आणि गारपिटीसह पावसाची शक्यता आहे.
मुंबई आणि पुण्यात कसं असेल हवामान?
पुण्यात आज अंशत: ढगाळ राहून मेघ गर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस होईल. त्यानंतर दोन दिवस आकाश बहुतांशी निरभ्र राहील.
मुंबईसह कोकण किनारपट्टीला पुन्हा एकदा तापमान वाढीचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळं नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. अरबी समुद्रातून येणारे दमट उष्ण वारे किनाऱ्याकडे सरकणार असल्याने गुरुवार, 25 एप्रिलपर्यंत किनारपट्टीवर उष्णता जाणवेल.