Weather Update Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राज्यात सतत हवामानात बदल होत आहे. परिणामी अवकाळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटीमुळे शेतीसह नागरि जीवनाचं देखईल मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान उष्णतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने देखील उष्माघाताचं प्रमाण देखील वाढलं आहे. यामध्ये आता पुन्हा हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
आता हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस राज्यात तुरळक ठिकाणी गडगडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात मात्र या अवकाळी पावसाची तीव्रता जास्त असण्याची शक्यता आहे. तेथे गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. अशी माहिती ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
पुढील पाच दिवस राज्यात वर्तवण्यात आलेल्या पावसाच्या अंदाजामध्ये मराठवाड्यात गुरूवारी आणि शुक्रवारी म्हणजे 26 आणि 27 एप्रिलला तीव्र पावसाची शक्यता आहे. तसेच गारपीट देखील होऊ शकते. तर विदर्भात मात्र गारपीटीचीच शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दुसरीकडे राज्यात एप्रिलच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात अवकाळी पावसाने झोडपून काढल्यांतर वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मात्र, मागील तीन-चार दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा तापमानात वाढ झाल्यानं महाराष्ट्र होरपळत आहे. राज्याच्या अनेक भागात 40 डिग्री सेल्सियशच्या वर तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळ नागरिकांना घराबाहेर पडणंही अवघड झालं आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे.