Download App

Weather Update : ऑक्टोबरची धगधग वाढणार, घरातून बाहेर पडताना काळजी घ्या; हवामान विभागाचा अंदाज

Weather Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने (Weather Update ) दडी मारल्यानंतर आता ऑक्टोबर हिटने डोके वर काढले आहे. ऑक्टोबर हीट राज्यातील काही भागांमध्ये जाणवायला सुरूवात झाली आहे. मात्र आता संपूर्ण राज्यात पुढील 10 दिवसांत प्रचंड उष्णता वाढणार आहे. तर त्यानंतर ही उष्णता हळूहळू कमी होईल. असा अंदाज हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे.

गोंदियात अजित पवार गटाला धक्का, माजी खासदार खुलाशचंद्र बोपचेंचा शरद पवार गटात प्रवेश

ऑक्टोबरची धगधग वाढणार…

हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी अंदाज वर्तवला आहे की, संपूर्ण राज्यात पुढील 10 दिवसांत प्रचंड उष्णता वाढणार आहे. तर त्यानंतर ही उष्णता हळूहळू कमी होईल. कारण विदर्भातील तापमान सरासरी 35 अंशांवर गेले आहे. तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात तापमानाचा पारा 34 अंशांवर गेलेला आहे. तर मुंबई आणि कोकण देखील 33 अंशांवर आहे.

PM Modi यांना आत्ताच हिमालयात पाठवा; प्रकाश आंबेडकरांचा टोला

त्यामुळे पुढील 10 दिवस नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असं अवाहन देखील हवामान विभागाने केलं आहे. दरम्यान यंदा मोसमी वारे हे गेल्या चार-पाच वर्षाच्या तुलनेत 14 दिवस अगोदर माघारी गेले आहेत. तसेच परतीच्या पावसाची देखील अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर मोसमी वारे माघारी जात असताना हवेच्या जास्त दाबाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ऑक्टोबर हीटच्या झळा यावर्षी अधिकच तीव्र झाल्या आहेत.

दरम्यान देशामध्ये अनेक राज्यांमध्ये पावसाचं पुनरागमन झाल्यानंतर आता 12 ऑक्टोबरनंतर देशातील विविध भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा परतीचा पाऊस असणार आहे. कारण देशातील विविध भागांमधून मान्सून माघारी परतायला सुरूवात झाली आहे. त्यामध्ये पुढील दोन दिवसांत पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, गंगेचा पश्चिम बंगाल, ओडिसा, छत्तीसगड तेलंगणा आणि महाराष्ट्र आणि मध्य अरबी समुद्रातील काही भागांमधून नैऋत्य मान्सून माघारीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.

Tags

follow us