PM Modi यांना आत्ताच हिमालयात पाठवा; प्रकाश आंबेडकरांचा टोला

PM Modi यांना आत्ताच हिमालयात पाठवा; प्रकाश आंबेडकरांचा टोला

PM Modi : पंतप्रधान मोदी (PM Modi) यांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी टोला लगावला आहे. सध्या राज्यात आणि देशात सत्ताधारी भाजपसह सर्वच पक्ष आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यासाठी सभा घेत आहेत. त्यात आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बीडमध्ये सभा घेतली. त्यावेळी त्यांनी भाजप आणि कॉंग्रेस दोन्हींवर देखील निशाणा साधला.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षाचे नीता अंबानींकडून पारंपारिक पद्धतीने स्वागत, पाहा फोटो

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

भाजपकडून 2024 मध्ये देखील देशात भाजपचीच सत्ता येणार आहे. तसेच पंतप्रधान मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. असा दावा केला जात आहे. त्याचबरोबर भाजपमध्ये वयाची 75 वर्षेच नेत्यांना पदावर ठेवण्याचा नियम करण्यात आला आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी हे केवळ दोन वर्षच पंतप्रधान पद भुषवतील आणि त्यानंतर ते हिमालयात निघून जातील अशी विधान केली जात आहेत.

Amitabh Bachchan यांच्या वाढदिवशी चाहत्यांना मिळालं गिफ्ट; या चित्रपटातील बींग बींचा फर्स्ट लूक लॉंच

त्यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी यांना टोला लगावला आहे. आंबेडकर म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे आरएसएसने मोदींना दोन वर्षांनी नाही. तर आताच त्यांना हिमालयात पाठवून द्या. देशाच फार भलं होईल. कारण आगामी काळात मोदी विरोधी पक्षांमध्ये बापात पबाप आणि लेकात लेक राहू देणार नाही.

तसेच त्यांनी यावेळी पंकजा मुंडेंना देखील सल्ला दिला. ते म्हणाले की, राज्यात सध्या राजकीय वातावरण तापलेलं असताना भाजपमधील काही नेत्यांची घुसमट होत असल्याचं दिसून येत आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंची सध्या घुसमट होत असल्याचं बोललं येत आहे. त्यावरुन आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी पंकजा मुंडे यांना सल्ला दिला आहे. पंकजा मुंडे बहुजनांच्या नेत्या त्यांनी बहुजनांसाठी वेगळा पक्ष काढावा, असा सल्ला प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube