गोंदियात अजित पवार गटाला धक्का, माजी खासदार खुलाशचंद्र बोपचेंचा शरद पवार गटात प्रवेश
Khushalchandra Bopache joined sharad pawar group : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) गटाने पक्षावरच दावा ठोकला आहे. त्यामुळं अजित पवार गट आणि शरद पवार (Sharad Pawar) गटातील सघर्ष तीव्र झाला आहे. अशातच आता गोंदिया अजित पवार गट आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांना मोठा धक्का बसला आहे. अजित पवार गटाचे माजी खासदार खुशालचंद्र बोपचे (Khushalchandra Bopache) आणि त्यांचे पुत्र रविकांत बोपचे यांनी शरद पवार गटाला साथ दिली आहे.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षाचे नीता अंबानींकडून पारंपारिक पद्धतीने स्वागत, पाहा फोटो
अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देत सत्तेत सहभागी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांना सोबत घेऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना धक्का दिला होता. ते स्वत: उपमुख्यमंत्री झाले तर त्यांच्यासोबत असलेल्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपला असल्याचा दावा केल्यानंतर अनेक जण अजित पवार गटात गेले. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विभाजनानंतरही आतापर्यंत अजित पवार गटासोबत राहिलेले गोंदिया – भंडारा लोकसभेचे माजी खासदार खुशालचंद्र बोपचे यांनी बुधवारी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला.
त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, आमदार डॉ. राजेश टोपे आदी उपस्थित होते.
2019 च्या निवडणुकीत तिरोरा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार असलेले युवा नेते रविकांत (गुड्डू) बोपचे यांनीही शरद पवार गटात प्रवेश केला आहे.
काही दिवसांपूर्वी सालेकसा तालुक्यातील युवक आघाडीच्या अध्यक्षाने आपल्या 300 समर्थक कार्यकर्त्यांसह कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून प्रफुल्ल पटेल यांना हादरा दिला होता. तर आता बोपचे पिता-पुत्रांनी शरद पवार गटात प्रवेश केल्याने जिल्ह्यातील अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.