Download App

Weather Update : पारा 13 अंशांवर, हुडहुडी वाढणार! हवामानाचा अंदाज काय ?

Weather Update : राज्यात अवकाळी पावसाने माघार घेतली आहे. दक्षिण भारतातील मिचॉन्ग चक्रीवादळाचा परिणाम संपला (Weather Update) आहे. त्यानंतर आता थंडीने जोर धरला आहे. मागील काही दिवसांपासून थंडीत सातत्याने वाढ होत आहे. विदर्भात गारठा जाणवत असला तरी किमान तापमानात थोडी वाढ झाली आहे. आग्नेय अरबी समुद्र सपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती मात्र कायम राहणार आहे. राज्यात सर्वात कमी तापमान गोंदिय येथे 13.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. येत्या चार ते पाच दिवसांत थंडी आणखी वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

राज्यात ठिकठिकाणी तापमानात घट होत असून थंडीत वाढ झाली आहे. पुणे शहरात या महिन्यात सर्वात कमी तापमानाची नोंद घेण्यात आली आहे. काल बुधवारी शहरातील तापमान 15 अंश सेल्सिअस नोंदले गेले, अशी माहिती हवामान विभागाने दिली. आतापर्यंतचे हे सर्वात कमी तापमान आहे. याआधी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला तापमानाचा पारा 16.9 अंश सेल्सिअस नोंदला गेला होता. आता मात्र तापमनान आणखी कमी झाले आहे.

Weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढणार! पुढील 24 तासांत तापमान आणखी घटण्याचा अंदाज

उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रात दिसून येत आहे. नगर शहरातही थंडीचा जोर वाढला आहे. सकाळच्या वेळी दाट धुके असते. तापमानात घट होत असल्याने अशी परिस्थिती निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले. पुढील काही दिवसांत थंडीत आणखी वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले.

दुसरीकडे आग्नेय अरबी समुद्रामध्ये असणाऱ्या मालदीव जवळ समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचावर चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण देखील असणार आहे. त्यामध्ये मध्य महाराष्ट्र, विदर्भ या ठिकाणी पहाटेच्या वेळी तापमानात मोठी घट होईल. तर कोकण आणि मुंबई या भागामध्ये रात्रीच्या वेळी तापमानात घट दिसून येईल दरम्यान थंडीचा कडाका वाढणार आहे. ही शेतकऱ्यांसाठी ही दिलासादायक गोष्ट आहे. रब्बी हंगामासाठी ही थंडी पोषक ठरणार आहे.

दक्षिण भारतातील तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात मिचॉन्ग चक्रीवादळाने थैमान (Cyclone Michaung) घातले असून मुसळधार पाऊस पडला. या पावसात (Rain Alert) मोठे नुकसान झाले. अनेक जण मृत्यूमुखी पडले. या वादळाचा परिणाम महाराष्ट्रातही दिसून आला आहे. काही ठिकाणी पाऊस झाला तसेच सर्वत्र ढगाळ हवामान होते.

Weather Update : ऐन थंडीत पाऊसधारा! आज ‘या’ भागात पाऊस लावणार हजेरी

 

Tags

follow us