Weather Update : सध्या देशातील हवामानात सातत्याने बदल होत ( Weather Update ) आहेत. याचे कारण वेस्टन डिस्टर्बन्स आहे असे सांगितले जात आहे. आता तापमानाचा पारा वाढत चालला असून थंडी कमी झाली आहे. दुसरीकडे काही भागात पुन्हा पावसाची (Rain Alert) चिन्हे दिसू लागली आहेत. काही भागात आधीच अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. आजही राज्यातील विदर्भ आणि मराठावाड्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Horoscope Today: ‘मिथुन’ राशीला मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…
नागपूर वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार आज नागपूरसह वर्धा, भंडारा, गोंदिया आणि अमरावती या भागासह विदर्भाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. वादळी वाऱ्यासह गारपीठ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच प्रशासनाने देखील नागरिकांना खबरदारीच्या उपाययोजनांच पालन करण्याचं आवाहन केलं.
जरांगेंनी फडणवीस टार्गेट करताच नामदेव जाधव हे पवारांवर घसरले
दुसरीकडे मराठवाड्यात देखील पुढील दोन ते तीन दिवस आठ जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी ढगांचा गडबड आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह किरकोळ पाऊस होण्याचा अंदाज देखील ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे. यामध्ये जालना, हिंगोली, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये हा पाऊस येण्याची शक्यता आहे. तसेच आज खान्देशसह नाशिक, नगर, जळगाव या जिल्ह्यातील ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
हा पाऊस अवकाळी असल्याने शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. पावसाचा फटका पिकांना बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मुंबई आणि पुण्यात पाऊस होईल अशी शक्यता नाही. जानेवारी महिन्यात दक्षिण तामिळनाडू, दक्षिण केरळ, लक्षद्वीपसह दक्षिण भारतात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला होता. त्यानंतर बरेच दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रासह अनेक राज्यांत पाऊस पुन्हा सुरू झाला आहे. हा पाऊस असाच सुरू राहिला तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, करडई या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.