जरांगेंनी फडणवीस टार्गेट करताच नामदेव जाधव हे पवारांवर घसरले
Namdev Jadhav : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) आंदोलन करणारे मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) आता आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis)गंभीर आरोप केले. त्यांनतर आता लेखक नामदेव जाधव (Namdev Jadhav) यांनी जरांगेंच्या आंदोलनाला राजकीय वास येत असल्याची टीका केली. यावेळी ते शरद पवारांवरही घसरले. पवार मराठा समाजाच्या आरक्षणाचे मारेकरी असल्याची टीका जाधवांनी केली.
फडणवीसांकडून पुणे पोलिसांना शाब्बासकी! 25 लाखांचं बक्षीस…
मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले. त्यांनी फडणवीसांवर जोरदार आरोप केले. हाच धागा पकडत जाधवांना शरद पवार आणि मनोज जरांगे यांच्यार जोरदार टीका केली. जाधव म्हणाले की, जरांगे एक विशिष्ट समाजाच्या नेत्याला टार्गेट करतात. मात्र, पवारांवर कुठलंही बालंट येऊ देत नाहीत. त्यामुळं मराठा समाजाच्या आरक्षणाचे मारेकरी असललेल्या पवारांच्या घरावर सकल मराठा समाजाच्या वतीने मोर्चा काढणार आहोत, असं जाधव म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर बिनबुडाचे आरोप कराल तर; जरांगे व विरोधकांना शेलारांचा थेट इशारा
ते म्हणाले, मराठा आरक्षणाच्या संदर्भात सुरूवातीपासून एका विशिष्ट पक्षाला टार्गेट करणं, आणि एकाला विशिष्ट वगळणं… एका विशिष्ट समाजाच्या नेत्याला टार्गेट करणं आणि एका विशिष्ट नेत्याला पूर्णपणे बाजूला करणं, त्यांच्यावर कुठंलही बालंट येऊ नाही, अशी व्यवस्था करणं हे सगळं संशयास्पद होतं. जरांगेंचं आंदोलन एका राजकीय पक्षाच्या दिशेने जातांना दिसत आहे. त्यांचं आंदोलन फक्त मराठा आरक्षणसाठी हवं होतं. मात्र, ते आंदोलन एका राजकीय पक्षाच्या बाजूने झुकलंय, असा आरोप जाधव यांनी केला.
ते पुढं म्हणाले की, त्यामुळं 23 मार्च 19 94 चा जीआर मी बाहेर काढला. मात्र ते शरद पवारांच्या गुडांना सहन न झाल्यानं त्यांनी माझ्यावर भ्याड हल्ला केला. या जीआर संदर्भात आणि माझ्यावरील हल्लासंदर्भात जरांगे पाटील बोलतील अशी अपेक्षा होता. मात्र, एकाला नेत्याला वगळणं आणि एकाला टार्गेट करणं यात जरांगे गुंतले होते. या आंदोलनाला कुठंतरी राजकारणाचा वास येत आहे. त्यामुळं आता आम्ही 1994 च्या जीआर संदर्भात संदर्भात शरद पवारांच्या घरावर मोर्चा काढत आहोत. मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी कोण? जवाब दो, जनाब जवाब दो… मराठा आरक्षण वापस करो, अशी घोषणाही जाधव यांनी दिली.
जरांगेचे आरोप काय?
मला सलाईनच्या माध्यमातून विष देण्याचा प्रयत्न केला जातोय. तसेच देवेंद्र फडणवीस माझे एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं जरांगे म्हणाले.