फडणवीसांकडून पुणे पोलिसांना शाब्बासकी! 25 लाखांचं बक्षीस…

फडणवीसांकडून पुणे पोलिसांना शाब्बासकी! 25 लाखांचं बक्षीस…

Devendra Fadnvis : पुण्यात ड्रग्जप्रकरणी पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी पोलिसांचं कौतूक करीत 25 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मोठी घोषणा केली आहे.

पुनित बालन ग्रुप प्रेझेंट्स ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचा मंगळवारपासून थरार !

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मागील काही दिवसांत पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केलीयं. तब्बल 3700 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले आहेत. अंमली पदार्थांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांतील पोलिसांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी अमली पदार्थ विक्री आणि तस्करीवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. जे काम बंदुकीची गोळी करू शकत नाही. ते काम अमली पदार्थ करतात. अमली पदार्थ सेवनामुळे तरुण पिढी उद्धस्त होते. अमली पदार्थ तस्करी आणि विक्री म्हणजे देशविरोधी गुन्हा असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

‘आर्टिकल 370’ आणि ‘क्रॅक’मध्ये कांटे की टक्कर; जाणून घ्या वीकेंडला कोण गाजवणार बॉक्स ऑफिस?

पुणे पोलिसांनी तीन हजार ७०० कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. अलीकडच्या काळातील ही सर्वात मोठी कारवाई असून पुणे पोलिसांची ही कारवाई अभिनंदनास पात्र आहे, असा शब्दात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिसांचे कौतुक केले. पोलिसांच्या संबंधित पथकाला २५ लाख रुपयांचे रोख बक्षीसही जाहीर केले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पुणे पोलिसांचे कौतुक करण्यासाठी शनिवारी पोलीस आयुक्तालयाला भेट दिली. यावेळी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रवीण पवार, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, अरविंद चावरिया, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर, सुनील तांबे उपस्थित होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube