Weather Update : पुढील पाच दिवस पाऊस; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांत अलर्ट जारी
Weather Update : सध्या देशातील हवामानात सातत्याने बदल होत (Weather Update) आहेत. याचे कारण वेस्टन डिस्टर्बन्स आहे असे सांगितले जात आहे. आता तापमानाचा पारा वाढत चालला असून थंडी कमी झाली आहे. दुसरीकडे काही भागात पुन्हा पावसाची (Rain Alert) चिन्हे दिसू लागली आहेत. काही भागात आधीच अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. आताही पुढील पाच दिवसात देशाच्या अनेक भागा किमान तापमानात बदल होण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार पश्चिम हिमालयीन भागात अनेक ठिकाणी बर्फवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा आणि झारखंड या राज्यांत पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
उत्तर भारतात होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे सर्वत्र तापमानात घट होत आहे. महाराष्ट्रात थंडीत वाढ झाली आहे. शनिवारी परभणीत 11.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सकाळी आणि संध्याकाळी कडाक्याची थंडी तर दुपारच्या वेळी उन्हाळा जाणवत आहे. पुढील दोन दिवस तापमान कमीच राहिल असा अंदाज परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान शास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. पुणे आणि मुंबईतही तापमानात घट होईल असा अंदाज आहे.
Weather Update : सावधान! राज्यात पुन्हा अवकाळी; ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा
राज्यात पुढील पाच दिवस म्हणजेच 29 फेब्रुवारीपर्यंत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 25 ते 27 फेब्रुवारी या तीन दिवसात विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. तसेच काही भागात गारपीटही होईल असा अंदाज आहे. नागपूर, गडचिरोली, गोंदिया, अमरावती या पाच जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. मागील आठवड्यात विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस झाला होता. त्याचा फटका पिकांना बसला होता.
हा पाऊस अवकाळी असल्याने शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. पावसाचा फटका पिकांना बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मुंबई आणि पुण्यात पाऊस होईल अशी शक्यता नाही. जानेवारी महिन्यात दक्षिण तामिळनाडू, दक्षिण केरळ, लक्षद्वीपसह दक्षिण भारतात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला होता. त्यानंतर बरेच दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रासह अनेक राज्यांत पाऊस पुन्हा सुरू झाला आहे. हा पाऊस असाच सुरू राहिला तर रब्बी हंगामातील गहू, हरभरा, करडई या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.