Rain Alert Today : राज्यात परतीच्या पावसामुळे (Return rain) अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (heavy rain) सुरू आहे. राज्यात अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी नद्या, नाल्यांना पूर आला आहे. गेल्या आठवडाभरापासून राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला असून बळीराजा सुखावला आहे. दरम्यान, येत्या ४८ तासांत राज्यात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे.
महाराष्ट्रात मान्सूनचा हंगाम संपला आहे. त्यामुळे आता परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे. पण त्याआधी धो-धो पाऊस पडणार असल्याचे संकेत पुणे वेधशाळेने दिले आहेत. येत्या ४८ तासांत राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
हवामान खात्याच्या पुणे वेधशाळेने कोल्हापूरसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे, तर पुणे, सांगली, सातारा जिल्ह्यांसाठीही ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
प्रवासामुळे मेकअप खराब झाल्यास काळजी करू नका, लोकलमध्ये महिलांसाठी ‘पावडर रूम’
सध्या मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस सुरू आहे. अशातच कोकण ते गोवा किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. समुद्राची पातळी वाढणार असल्यानं किनारपट्टी भागातील मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, रविवारी दिवसभर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्यांत दमदार पाऊस झाला. पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत.
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मात्र, त्यानंतर तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
दरम्यान, मान्सूनचा हंगाम संपला असून परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झाला आहे. दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमधून मान्सून परतला आहे. याशिवाय मध्य प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश या राज्यांतील विविध भागांतून मान्सूनच्या माघारीचा प्रवास सुरू होत आहे. 4 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातून मान्सून माघारी सुरू होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.