Download App

शिर्डीच्या साईमंदिरात 3 दिवसांत 4 कोटींची देणगी जमा

  • Written By: Last Updated:

अहमदनगर : देशभरातील प्रसिध्द असलेल्या मंदिरामध्ये शिर्डीच्या साईबाबा मंदिरांचचं (Saibaba temples) नाव हे नेहमीच घेतलं जातं. साईबाबा संस्थान हे देशातल्या श्रीमंत मंदिरापैकी एक आहे. देश-विदेशातून लोक शिर्डीच्या साईबाबाचं दर्शन घेण्यासाठी येतात. हे श्रध्दाळू भक्तगण दानपेटीत आपलं दान साईबाबांना अर्पित करत असतात. 29 मार्च ते 31 मार्च दरम्यान, साजरा करण्यात आलेल्या रामनवमीच्या उत्सवात दोन लाख साईभक्तांनी साईबाबाचं दर्शन घेतलं. या तीन दिवसाच्या उत्सवात संस्थानला विविध स्वरुपातीत तब्बल 4 कोटी 9 लाख रुपयांचं दान प्राक्त झाल्याची माहिती संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी दिली.

जाधव यांनी साईभक्तांकडून प्राप्त झालेल्या देणगीविषयी बोलतांना सांगितलं की, रामनवमीचा उत्सव हा देशभरात अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा झाला. साईसंस्थानमध्येही दरवर्षी प्रमाणे यंदाही रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला आहे. या रामनवमी उत्सहाच्या दरम्यान, लाखो भाविक हे साईंच्या चरणी नतमस्तक झाले. यावेळी भक्तांनी संस्थानला देणगीच्या स्वरुपात भरभरून दान केलं. त्यात 1 कोटी 81 लाख 82 हजार 136 रुपये दानपेटीतून, 76 लाख 18 हजार 143 रुपये देणगी काऊंटद्वारे, तर डेबीट क्रेडीट कार्ड,ऑनलाईन देणगी, चेक, डीडी, मनी ऑर्डर यामाध्यमातून तब्बल 1 कोटी 42 लाख 52 हजार 812 रुपये प्राप्त झाले आहेत.

संजय राऊतांचे वक्तव्य म्हणजे फक्त स्टंटबाजी, राणेंचा हल्लाबोल

जाधव यांनी सांगितले की, याशिवाय, सोनं 171.150 ग्रॅम सोनं, 2713 ग्रॅम चांदी देणगी प्राप्त झाली आहे. तसेच या व्यतिरिक्त या रामनवमी उत्सव काळात सशुल्क आणि ऑनलाईन पासेसद्वारे एकून 61 लाख 43 हजार 800 रुपये प्राप्त झाले आहेत.

दरम्यान, या रामनवमी उत्सवकाळात 1,85,413 साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा आस्वाद घेतला तर 32,530 साईभक्तांनी अन्नपाकीटांचा लाभ घेतला. याबरोबर 32500 तीन नगाचे लाडून पाकीटे व 3,39,590 एक नगाचे लाडू पाकीटांची विक्री करण्यात आली असून यातून संस्थानला 42 लाख 08 हजार 400 रुपये प्राप्त झाल्याचं त्यांनी सांगिलतं आहे.

 

Tags

follow us