Download App

पाच वर्षांचा मुलगा पडला बोअरवेलमध्ये, बचावकार्य सुरू

अहमदनगर : कर्जत (Karjat) तालुक्यातील कोपर्डी (Kopardi) येथे शेतातील बोअरवेलमध्ये ऊसतोड कामगाराचा पाच वर्षांचा मुलगा पडला. त्याला वाचवण्यासाठी प्रशानाकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. आज सायंकाळी ही घटना घडली.

या परिस्थितीवर तालुका प्रशासन लक्ष ठेवून आहे.कोपर्डी (ता.कर्जत) येथील संदीप ज्ञानदेव सुद्रीक यांच्या उसाच्या शेतात ऊसतोड करणाऱ्या कामगारांचा पाच वर्षाचा मुलगा सागर बुधा बरेला (रा.चिडियापूर, मध्यप्रदेश) हा आज सायंकाळी ६ च्या सुमारास बोअरमध्ये पडला. तो बोअरच्या १५ फूट खोलीवर असल्याचे जाणवत असून त्याला वाचविण्यासाठी समांतर दोन जेसीबीच्या साह्याने खोदकाम सुरू आहे.

ठाकरे गटात काय चालंत हे सर्वांनाच माहिती.., प्रवेशानंतर भूषण देसाईंची टीका

या घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलीस निरीक्षक सतीश गावित यांच्यासह पोलीस कर्मचारी श्याम जाधव, गोवर्धन कदम, राहुल खरात आणि जितेंद्र सरोदे यांनी कोपर्डी गाठत युद्धपातळीवर ग्रामस्थांच्या साहाय्याने मदतकार्य हाती घेतले.

घटनास्थळी कुळधरण प्राथमिक आरोग्य केंद्रासह उपजिल्हा रुग्णालयाची टीम, कर्जत नगरपंचायत अग्निशामक दल यांच्यासह महसूल प्रशासन आणि गटविकास अधिकारी तळ ठोकून आहेत.

Tags

follow us