ठाकरे गटात काय चालंत हे सर्वांनाच माहिती.., प्रवेशानंतर भूषण देसाईंची टीका
ठाणे : ठाकरे गटात काय चालतं हे सर्वांनाच माहीत आहे, शिंदे गट वॉशिंगमशीन नाहीतर इथं प्रगतीने विकासकामे होत असल्यानेच मी प्रवेश केला असल्याचं भूषण देसाईंनी स्पष्ट केलं आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण देसाईने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या प्रवेशानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय.
मोठी बातमी: उद्धव ठाकरेंना धक्का, सुभाष देसाईंच्या मुलाचा शिंदे गटात प्रवेश
देसाई म्हणाले, प्रत्येकाचा स्वतंत्र विचार असतो, बाळासाहेब आणि शिवसेना सोडून मला बाकी काही माहित नसल्याची पहिली प्रतिक्रिया देसाई यांनी दिली आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचा मुलगा देसाईने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
ते म्हणाले, हिंदुत्वाचा विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहे, शिवसेना वाढवत आहेत, त्यावर माझा विश्वास असून
मी आधीपासून शिंदे यांच्यासोबत काम केलं आहे. त्यांच्या कामाचा वेग निर्णय क्षमता पाहिली म्हणून मी आज शिंदे गटात प्रवेश केला असल्याचं त्यांनी सांगितलंय.
Share Market Updates : शेअर बाजारात मोठी पडझड ; सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला, निफ्टी 17200 च्या खाली
तसेच मी एक छोटा कार्यकर्ता म्हणून माझं काम मी करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी जबाबदारी माझ्यावर देतील त्या पद्धतीने पुढे काम करणार असल्याचंही त्यांनी यावेळी ठामपणे सांगितलंय. यावेळी बोलताना भूषण देसाईंनी वडिल सुभाष देसाईंबद्दलही भाष्य केलं आहे.
माझा स्वतंत्र विचार असू शकतो. हा माझा विचार आहे. माझ्या प्रवेशाबाबत नवी सरकार स्थापन झालं होतं त्याचवेळी माझं वडीलांशी बोलणं झालं, त्यावेळी त्यांनी गांभीर्याने घेतलं नसल्याचं देसाईंनी सांगितलं आहे.
शिवसेनेच्या दुसऱ्या काय चालतं हे सर्वांना माहितच आहे. मी खूप लहान आहे त्यावर मा काही बोलू नाही शकत. ही वॉशिंगमशीन नाहीतर प्रगतीने विकासकामे होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, शिंदे गटात मी निवडणूक किंवा पदासाठी मी आलो नसून पक्षासाठी काम करणार असल्याचं भूषण देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.