Share Market Updates : शेअर बाजारात मोठी पडझड ; सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला, निफ्टी 17200 च्या खाली

  • Written By: Published:
Share Market Updates : शेअर बाजारात मोठी पडझड ; सेन्सेक्स 1000 अंकांनी घसरला, निफ्टी 17200 च्या खाली

मुंबई : आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजार वरती उघडल्यानंतर, व्यवसाय बंद होईपर्यंत त्यात मोठी घसरण नोंदवली गेली होती. सोमवारी सेन्सेक्स 897.28 अंकांनी घसरून 58,237.85 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 258.60 अंकांनी घसरून 17154.30 च्या पातळीवर पोहोचला. या काळात इंडसइंडच्या शेअर्समध्ये सुमारे सहा टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. असे मानले जाते की एव्हीबी आणि सिग्नेचर बँक बुडण्याच्या वृत्ताचा सोमवारी व्यापार सत्रात नकारात्मक परिणाम झाला.

गेल्या तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना सुमारे 7.3 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या दरम्यान सेन्सेक्स 2110 अंकांपर्यंत घसरला आहे. केवळ सोमवारीच गुंतवणूकदारांचे सुमारे चार लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सत्रात BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप 258.95 लाख कोटी रुपयांवर घसरले. गेल्या शुक्रवारी ते 262.94 कोटी रुपये होते.

Kane Williamson : भारताला पराभूत करणाऱ्या कर्णधारानेच दिलं WTCच्या अंतिम सामन्यात स्थान 

अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक बुडण्याच्या वृत्ताचा संपूर्ण जगाच्या इक्विटी मार्केटवर नकारात्मक परिणाम झाला. विशेषतः बँकिंग क्षेत्रात शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. सोमवारी भारतीय शेअर बाजारात बँकिंग क्षेत्रातील समभाग कमजोरीसह व्यवहार करताना दिसले. मात्र, भारतीय बँकांच्या बाबतीत नियामक चौकट खूपच मजबूत असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.

ऑटो आणि बँकिंग क्षेत्रातील समभागांनी सोमवारी बाजारात मोठी घसरण केली. एसबीआय, टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्राचे समभाग तीन टक्क्यांपर्यंत घसरले. दुसरीकडे, टेक महिंद्राच्या शेअर्समध्ये सुमारे सात टक्क्यांची मजबूती दिसून आली.

राहुल कुल यांचे निलंबन करा, भाजप नेत्याची मागणी; कुल यांच्याविरोधात दौंडमध्ये भाजप-राष्ट्रवादी एकत्र

आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजारातील घसरणीची प्रमुख कारणे

– जागतिक बाजारातून नकारात्मक संकेत

– अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँक यांची दिवाळखोरी

– SVB कोसळल्यामुळे बँकिंग क्षेत्रातील समभागांची कामगिरी कमी झाली

– रिलायन्स, टीसीएस आणि आयटीसीसारख्या दिग्गज कंपन्यांच्या शेअर्समध्ये कमजोरी

– डॉलरच्या तुलनेत रुपयाची कमजोरी

– फेड व्याजदरात आणखी वाढ करण्याची शक्यता आहे

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube