अहमदनगर : सध्या राज्यात कांदा प्रश्नावरुन चांगलच वातावरण तापलं आहे. कांदा दराच्या मुद्यावरुन राज्यासह जिल्ह्यातही विविध आंदाेलनातून शेतकरी आक्रमक झाले आहे.
'नया मुल्ला जोर से बांग देता है, तसा हा भाडगा मुल्ला'#Bhaskarjadhav #Ramdaskadamhttps://t.co/gei5cT1Rlo
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) March 6, 2023
त्यात अहमदनगरमध्ये शेतकरी संघटना आणि शेतकरी विकास मंडळाने अनाेखी शक्कल लावत थेट कांद्याचे पार्सलच पंतप्रधानांना पाेस्टाद्वारे पाठविले आहे. सरकारकडून कांद्याला हमीभाव मिळावा, निर्यात धाेरण बदलावे, अशी मागणी करीत गळ्यात कांद्याच्या माळा घालून शेतकऱ्यांनी अहमदनगरच्या मुख्य पाेस्ट कार्यालयासमाेर गांधीगिरी केली.
मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; व्यापाऱ्यांना मिळणार मोठा दिलासा
सरकारच्या कांदा निर्यात धोरणामुळे कांद्याचे दर घसरल्याचे शेतकरी आणि व्यापारी सांगत आहेत. अहमदनगर जिल्ह्याचा विचार केला, तर कांद्याची लागवड ही ३० टक्क्यांनी वाढली आहे.
त्यातच लाल कांदा हा जास्त काळ टिकत नसल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणत आहे. ‘आज राज्यात कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
…म्हणून सुनील गावस्कर थेट ऑस्ट्रेलियन निवडकर्त्यांवर भडकले
शेतकऱ्यांनी कांद्यासाठी केलेला खर्चही निघणे अवघड झाले आहे. त्यात शेतकऱ्यांनी आंदाेलन केले, तर त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मात्र, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना प्रती क्विंटल एक हजार रूपये अनुदान द्यावे. सरकारने कांद्यासहीत सर्व शेत मालावरची निर्यातबंदी तत्काळ उठवावी, अशी भावना शेतकरी शिवराज कापरे, बच्चू माेढवे यांनी व्यक्त केली.