…म्हणून सुनील गावस्कर थेट ऑस्ट्रेलियन निवडकर्त्यांवर भडकले
मुंबई : भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीवर चांगलेच संतापले असल्याचे दिसून आले आहे. ऑस्ट्रेलियन संघाने अहमदाबाद कसोटी जिंकून ही चार सामन्यांची मालिका अनिर्णित ठेवली तरी ऑस्ट्रेलियन निवडकर्त्यांनी राजीनामा द्यावा, असे गावस्कर म्हणाले आहे.
दरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे तीन सामने झाले असून यामधील 2 सामन्यात भारताने विजय मिळवला तर एका सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना अहमदाबादमध्ये 9 मार्च रोजी होणार आहे.
कढीपत्ता खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहिती आहे का?
म्हणून गावस्कर भडकले
ऑस्ट्रेलियाच्या चार सामन्यांच्या मालिकेतील खराब कामगिरीवर सुनील गावस्कर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. संघाच्या खराब कामगिरीला संघाचे निवडकर्ते जबाबदार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. संघाच्या निवडकर्त्यांनी दुखापतग्रस्त अशा तीन खेळाडूंची निवड केली. पहिल्या दोन सामन्यात तो खेळणार नसल्याचे त्याच्याबाबत आधीच ठरले होते. मालिका अर्ध्यावर येऊन ठेपली होती आणि प्लेइंग इलेव्हन निवडण्यासाठी व्यवस्थापनाकडे फक्त 13 खेळाडू उरले होते. निवडकर्त्यांना त्यांच्या जबाबदारीची थोडीही काळजी असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा.
अवघ्या दीड लाखात खरेदी करा TATA ची भन्नाट कार
हे आहेत जखमी खेळाडू
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 च्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाचे मिचेल स्टार्क, कॅमेरॉन ग्रीन आणि जोश हेझलवूड उपलब्ध नव्हते. हे तिन्ही खेळाडू दुखापतग्रस्त होते. याशिवाय संघात अॅश्टन अगर आणि मिचेल स्वीपसनसारखे फिरकीपटू असूनही ऑस्ट्रेलियन संघाने मालिकेत मध्येच मॅथ्यू कुहनेमनचा संघात समावेश केला होता.