अवघ्या दीड लाखात खरेदी करा TATA ची भन्नाट कार

अवघ्या दीड लाखात खरेदी करा TATA ची भन्नाट कार

मुंबई : वाहन क्षेत्रातील आघाडीची कंपनी म्हणून टाटा मोटर्सकडे पहिले जाते. मार्केटमध्ये टाटाच्या वाहनांना मोठी पसंती देखील आहे. TATA सध्या देशातील तिसरी सर्वात मोठी कार विक्री करणारी कंपनी आहे. टाटा मोटर्सकडे विविध किंमती आणि वैशिष्ट्यांसह अनेक मॉडेल्स आहेत. यातील सर्वात स्वस्त कार टाटा टियागो आहे. विशेष म्हणजे ही कार तुम्ही फक्त 1.5 लाख रुपये खर्च करून घरी घेऊन येऊ शकता.

Tata Tiago किंमत रु. 5.54 लाखांपासून सुरू होते आणि रु. 8.05 लाख (एक्स-शोरूम दिल्ली) पर्यंत जाते. विशेष म्हणजे कंपनीने अलीकडेच Tata Tiago च्या किमती 15,000 रुपयांनी वाढवल्या आहेत. हे सहा ट्रिम्स XE, XM, XT(O), XT, XZ आणि XZ+ मध्ये विकले जाते. जर तुम्हाला ही कार कर्जावर खरेदी करायची असेल, तर तुम्ही दीड लाख रुपये भरूनही कार घरी घेऊन येऊ शकता. येथे तुम्हाला EMI चा पर्याय उपलब्ध आहे.

आपण असे गृहीत धरू की तुम्ही वाहन हे कर्जावर खरेदी करत आहात. तर येथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार अधिक डाउन पेमेंट देऊ शकता, वेगवेगळ्या बँकांमध्ये व्याजदर वेगवेगळा असतो आणि कर्जाचा कालावधी 1 सेल ते 7 वर्षे देखील निवडला जाऊ शकतो.

कढीपत्ता खाण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहिती आहे का?

समजा 1.5 लाख रुपयांचे डाउन पेमेंट, 9.8 टक्के व्याजदर आणि 5 वर्षांचा कर्जाचा कालावधी गृहीत धरू. अशा परिस्थितीत, तुम्हाला दरमहा 10,262 रुपये EMI भरावे लागेल. तुम्हाला एकूण कर्जाच्या रकमेसाठी (रु. 4.85 लाख) अतिरिक्त 1.30 लाख रुपये द्यावे लागतील.

Ajay Devgn’s Bholaa : ‘लढाई हौसलोसे जिती जाती है…’ अजय देवगणच्या भोलाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर रिलीज

वैशिष्ट्ये
यात Apple CarPlay आणि Android Auto सह 7-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, LED DRLs सह प्रोजेक्टर हेडलाइट्स आणि वायपरसह मागील डिफॉगर आहे. यात आठ-स्पीकर साउंड सिस्टीम, स्वयंचलित हवामान नियंत्रण आणि कूल्ड ग्लोव्हबॉक्स देखील मिळतो.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube