Download App

गुढीपाडव्यास नगरकरांना रसिक ग्रुपची अनोखी मेजवानी

  • Written By: Last Updated:

अहमदनगर : गुढीपाडव्यापासून सुरु होणारे मराठी नव वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी गेल्या २० वर्षापासून भव्य संगीत सांस्कृतिक रसिकोत्सवाचे आयोजन नगरच्या रसिक ग्रुपच्या वतीने केले जात आहे. यावर्षी २१ व्या रसिकोत्सव बुधवार (दि.२२) रोजी सायंकाळी ६ वाजता सावेडीच्या जॉगिंग पार्कच्या मैदानावर  होणार आहे. या रसिकोत्सवाला नामवंत गायक-गायिका, नृत्यांगना व दिग्गज कलाकारांची हजेरी लागणार आहे.

यावर्षी महाराष्ट्राचा आवाज म्हणून ओळखले जाणरे सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसले, सिने अभिनेत्री व स्वराज्य रक्षक संभाजी सिरीयल फेम प्राजक्ता गायकवाड हे प्रमुख या कार्यक्रमाचे आकर्षण आहेत. यांच्यासह पांडू फिल्म फेम पार्श्वगायिका अबोलि गिऱ्हे, सुर नवा ध्यास नवा विजेती महागायिका सन्मिता शिंदे-धापटे, सुर नवा ध्यास नवा फेम रवींद्र खोमणे, प्रसिद्ध नृत्यांगणा राधिका पेंडसे, झी हिंदी सारेगमप लिटल चॅम्प्स फेम ज्ञानेश्वरी घाडगे, सुप्रसिद्ध निवेदक संदीप पाटील व झी सारेगमप फेम श्रावणी महाजन या दिग्गज व सुपरस्टार कलाकारांच्या उपस्थितीत जुने-नवे मराठी आणि हिंदी गीते, नाट्य संगीत व नृत्याविष्काराने महाराष्ट्रातील सर्वात मोठा गुढीपाडवा सांस्कृतिक सोहळा रंगणार आहे. हा सोहळा सर्वांसाठी खुला आहे. यासाठी जॉगिंग पार्कच्या मैदानावर भव्य स्टेज व बैठक व्यवस्थेची जय्यत तयारी सुरु आहे, अशी माहिती रसिकोत्सवाचे संयोजक व रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलूलकर यांनी दिली.

नाश्त्यासाठी बनवा खास हरभरा डाळ वडा

‘रसिकोत्सव’ बद्दल अधिक माहिती देताना येलूलकर यांनी सांगितले की, राज्यात सर्वत्र गुढीपाडव्यानिमित्त भव्य सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. याची मुहूर्तमेढ नगर शहरातून रसिक ग्रुपने २० वर्षापूर्वी केल्याचा अभिमान रसिक ग्रुप व सर्व नगरकरांना आहे. या रसिकोत्सव सोहळ्याने नगरची सांस्कृतिक शहर म्हणून राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे. रसिक नगरकर वर्षभर या सांस्कृतिक सोहळ्याची वाट पाहत असतात. या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमास सुमारे ४० ते ५० हजार नागरिक उपस्थितीत लावत असतात. रसिकोत्सव कार्यक्रमाची निर्मिती रसिक ग्रुपने केली असून अनासपुरे मीडिया हाउसची प्रस्तुती आहे. या कार्यक्रमाचे महानगरपालिका मुख्य प्रायोजक असून प्रायोजक लेट्सअप, कोहिनूर, एस.जी.कायगांवकर, महावीर कंन्स्ट्रक्शन व सह प्रायोजक पारस पाईप, क्लासिक व्हील्स, कायनेटिक व ग्लोबवीन ग्रुप यांच्यासह अनेक दानशूर नागरिकांचे बहुमोल सहकार्य लाभत आहे.

या रसिकोत्सवास प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, खा. डॉ. सुजय विखे, आ. संग्राम जगताप, महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समिती सभापती गणेश कवडे, पोलीस अधिक्षक राकेश ओला, मनापा आयुक्त डॉ. पंकज जावळे, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, सुभाष कायगांवकर, अश्विन गांधी, राजेश भंडारी, पेमराज बोथरा, सुनील मुथा, सुनील मुनोत, शशीकांत गुळवे, गौतम मुनोत, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, विरोधीपक्ष नेते संपत बारस्कर, सभागृह नेते विनीत पाउलबुद्धे, उपायुक्त प्रदीप पठारे, अशोक जाधव आदींसह सर्व नगरसेवक व प्रशासकीय अधिकारी, विविध क्षेत्रातिल मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ्यात नगर शहराच्या जडणघडणीत, विकासात व नावलौकिकात मोलाची भर घालणारे उद्योजक व बडीसाजन ओसवाल श्री संघाचे अध्यक्ष पेमराज बोथरा, क्लासिक व्हिल्स कंपनीचे संचालक सुनील मुनोत, प्रसिद्ध बाल कलाकार आरुष बेडेकर व जितो संस्था यांना रसिक गौरव पुरस्कार, तसेच खा. डॉ.सुजय विखे व आ.संग्राम जगताप यांना रसिक सन्मान पुरस्कार व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त लेखक दिग्दर्शक अभिजित दळवी यांना तरुणाई पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

रसिक ग्रुपचे हनीफ शेख, सुदर्शन कुलकर्णी, विनायक वराडे, समीर पाठक, दिपाली देऊतकर, श्रीक्रुष्ण बारटक्के, ऋषिकेश येलुलकर, तेजा पाठक, शारदा होशिंग, गणेश भूतारे, स्नेहल उपाध्ये, प्रशांत अंतापेट्टू, मीनाक्षी पाटील, प्रसन्न एखे, फारुख शेख, निखील डफळ, बालकृष्ण गोटीपामुल, कार्तिक नायर, तेजस अतीतकर, संकेत होशिंग, किरण गवते, बाळासाहेब नरसाळे, प्रशांत देशपांडे व तुषार बगे आदी या सोहळ्याची तयारी करत आहेत.

Tags

follow us