अहमदनगरमध्ये रंगणार कुस्त्यांचा आखाडा; विजेत्यास मिळणार साेन्याची गदा

अहमदनगर : अहमदनगर शहरात एप्रिलमध्ये तीन दिवसीय छत्रपती शिवराय केसरी निमंत्रित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धांचे आयाेजन भाजप, शिवसेना व अहमदनगर जिल्हा तालीम संघातर्फे करण्यात आले. थेट कागद दाखवत आव्हडांची टीका, म्हणाले, ‘राज ठाकरेंचं कालचं भाषण स्क्रिप्टेड मॅच’ गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या स्पर्धेच्या आखाड्यासाठी आणलेल्या लाल मातीचे पूजन करण्यात आले.आखाडा माती पूजनासाठी भाजपचे नेते […]

Ahmednagar Kusti Competition

Ahmednagar Kusti Competition

अहमदनगर : अहमदनगर शहरात एप्रिलमध्ये तीन दिवसीय छत्रपती शिवराय केसरी निमंत्रित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धांचे आयाेजन भाजप, शिवसेना व अहमदनगर जिल्हा तालीम संघातर्फे करण्यात आले.

थेट कागद दाखवत आव्हडांची टीका, म्हणाले, ‘राज ठाकरेंचं कालचं भाषण स्क्रिप्टेड मॅच’

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या स्पर्धेच्या आखाड्यासाठी आणलेल्या लाल मातीचे पूजन करण्यात आले.आखाडा माती पूजनासाठी भाजपचे नेते वसंत लोढा, भाजपचे युवा नेते सुवेंद्र गांधी, जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष वैभव लांडगे, माजी नगरसेवक संभाजी लोंढे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, प्रशांत मुथा, नाना डोंगरे आदी उपस्थित हाेते.

विमानसेवा… पुणे – मुंबई प्रवास होणार अवघ्या तासाभराचा

कुस्ती स्पर्धा वाडियापार्क क्रीडा संकुल येथे माती व गादी विभागात रंगणार आहे. या स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे विजेत्या खेळाडूस अर्धा किलो सोन्याची गदा बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. द्वितीय विजेत्या मल्लास दोन लाख, तर तृतीय स्पर्धकास एक लाख रुपयाचे बक्षीस देण्यात येणार आहे.

Exit mobile version