Download App

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपीला 20 वर्षांची शिक्षा…

एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस 20 वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा, 10 हजार रुपयांची दंड आणि 1 वर्षांची साध्या कैदेची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली आहे. अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालय अतिरिक्त व विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश पी. आर. देशमुख यांनी आरोपीला शिक्षा ठोठावली आहे. दरम्यान, या खटल्याचे कामकाज विशेष सरकारी वकिल मनिषा केळगंद्रे-शिंदे यांनी पाहिले आहे.

आणखी एका मोठ्या राज्यात ‘द केरळ स्टोरी’वर बंदी, बदनामीचे षडयंत्र

निलेश राजु झेंडे (वय २२) असं या आरोपीचं नाव असून दि. 4 एप्रिल 2022 रोजी पीडित मुलीचा दहावीचा अखेरचा पेपर होता. त्याच रात्री पीडित मुलगी घरातून गायब असल्याने पीडितेच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांत गुन्हा दाखल केल्यानंतर पीडित मुलीचा तपास केला असता पीडितेला घेऊन आरोपी पुण्यात गणपती माथा वारजे इथं राहत असल्याची माहिती समोर आली.

अजितदादांनी केली शिंदेंची नक्कल; म्हणाले, स्ट्रॉबेरी बघून शेती होते का?

त्यानंतर पोलिसांनी पीडित मुलगी आणि आरोपीला ताब्यात घेत चौकशी केली असता पीडितेने सांगितलं, तुझे पेपर आता संपलेत आपण पळून जाऊन लग्न करु. त्यानूसार आरोपीने पीडित मुलीशी ज्या ठिकाणी पळवून नेलं त्याच ठिकाणी गळ्यात हार घालून लग्न केलं. एका रुमवर आणि पुण्यातल्या गणपती माथा वारजे इथं आरोपीने शारिरिक संबंध ठेवले असल्याचं पीडित मुलीने जबाबात सांगितलं.

दुसऱ्याच्या संस्थेत घटना बदलून अध्यक्ष झालेले…; बावनकुळेंचा पवारांना टोला

या घटनेप्रकरणी पीडित मुलीच्या जबाबानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष शेळके यांनी जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं. या खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने एकूण 8 साक्षीदार तपासण्यात आले असून पुरावा आणि युक्तीवाद ग्राह्य धरत जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे.

दरम्यान, या खटल्यात विशेष सरकारी वकील मनिषा केळगंद्रे-शिंदे, सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष शेळके, पोलिस कर्मचारी विजय गावडे, यांनी सहकार्य केले आहे.

Tags

follow us