धक्कादायक! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं, भाजपच्या दोन गटांत वाद

आपल्या समर्थक उमेदवारास उमेदवारी न मिळाल्याच्या करणावरून दुसऱ्या गटाने कार्यालय फोडल्याचा आरोप करण्यात आला.

News Photo   2026 01 02T220602.664

राज्यभरात सध्या महानगरपालिका निवडणुकांचं वार वाहतय. (Election) उमेदवारी मागं घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. अनेक ठिकाणी बिनविरोधाचे फटाके फुटले आहेत. तर काही ठिकाणी नाराजीनाट्य पाहायला मिळालं आहे. दरम्यान, सोरापुरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजपमधील दोन गटात टोकाचा वाद झाल्याच चित्र पाहायला मिळालं. येथी जोशी गल्ली परिसरातील भाजपचे माजी नगरसेवक शंकर शिंदे यांचे संपर्क कार्यालय भाजपच्याच दुसऱ्या गटाने फोडलं.

आपल्या समर्थक उमेदवारास उमेदवारी न मिळाल्याच्या करणावरून दुसऱ्या गटाने कार्यालय फोडल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी, पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावून हस्तक्षेप केला. मात्र, येथील राड्यातच एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, या घटनेनंतर महापालिका परिसरातील घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

राजकीय वादातून ही हत्या झाली असून बाळासाहेब सरवदे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. मनसे विद्यार्थी सेनेचे ते पदाधिकारी होते.सोलापूर महापालिका प्रभाग दोनमध्ये अर्ज माघारी घेण्यावरून आज भाजपच्या दोन गटात वाद झाला. प्रभाग दोनमध्ये शालन शिंदे ह्या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत, तर त्यांच्याविरोधात भाजपच्या बंडखोर रेखा सरवदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

वंचित आणि काँग्रेसच्या युतीमुळे भाजप व मित्रपक्षांत भीती; वंचितच्या प्रवक्त्या रुपवते यांचं वक्तव्य

रेखा सरवदे यांनी अर्ज माघारी घ्यावा यासाठी शिंदे आणि सरवदे या दोन गटात मोठा वाद झाला, या वादात भाजप नेते शंकर शिंदे यांचे कार्यालय देखील फोडण्यात आलं. मात्र, त्याचवेळी शिंदे गटाच्या लोकांनी मध्यस्तीसाठी आलेल्या बाळासाहेब सरवदे यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप सरवदे यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

या हल्यात गंभीर जखमी झालेल्या बाळासाहेब सरवदे यांना उपचारासाठी सोलापूरच्या सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या घटनेनंतर शहरात तणावाचं वातावरण असून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. दरम्यान, बाळासाहेब सरवदे हत्याप्रकरणातील 4 संशयितांना सोलापुरातील जेलरोड पोलिसांनी ताब्यात घेतलं असून उर्वरित आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

येथील प्रभाग दोनमधून भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचे पुत्र किरण देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हे संपूर्ण पॅनल बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून मोठा दबाव होता, त्यामुळे सरवदे कुटुंबावर भाजप नेत्यांकडून दबाव आणला जातं होता. समाजात वाद नको म्हणून ते सोडवायला मनसे नेते बाळासाहेब सरवदे गेले होते. त्यावेळी शिंदे गटातील लोकांनी त्यांची हत्या केल्याचा आरोप मनसेचे लोकसभा क्षेत्र प्रमुख पदाधिकारी प्रशांत इंगळे यांनी केला आहे.

follow us