पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीसाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. अहिल्याबाई होळकर यांच जन्मगाव अहमदनगरमधील जामखेड तालुक्यातील चौंडी इथं उत्साहात साजरी करण्यात येते.मागील अनेक दिवसांपासून आमदार राम शिंदे जयंतीच्पा निधीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करीत होते. अखेर शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
Uday Samant : उष्माघात प्रकरणाचं राजकीय भांडवल करु नका…
जयंती साजरी करण्यासाठी राज्य सरकारकडून 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याबाबतचं पत्र प्रसिद्ध करण्यात आलं आहे. याबाबतचे आदेश राज्य शासनाचे उपसचिव स.हा.धुरी यांनी काढले आहेत.
अतिक अहमदच्या हत्येपूर्वी जया पाल म्हणाल्या होत्या…
यासंदर्भात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या माहेरचे नववे वंशज आमदार राम शिंदे यांनी 3 एप्रिल रोजी दिलेल्या पत्रानुसार आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी 4 एप्रिल रोजी दिलेल्या पत्रानुसार जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारणमधून निधी उपलब्ध करुन देत असल्याचे पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
या अधिकाऱ्यांना तुरुंगात पाठवायला पाहिजे; सुप्रीम कोर्टाने मुंबई मेट्रो प्राधिकरणाला फटकारले
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2023-24 अंतर्गत़ 50 लाख रुपये निधी देण्यास शासन मान्यता देत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती 31 मे 2023 रोजी चौंडी येथे साजरा होणार असून सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील अहिल्याप्रेमींमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.