Ahmednagar : बाजार समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील १४ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाल संपल्याने बाजार समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. यासाठी २८ एप्रिल राेजी मतदान घेतले जाणार आहे. अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणात मोठी अपडेट… २७ मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू हाेणार आहे. राज्य निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डाॅ. पी. एल. खंडागळे यांनी तसे पत्रच जारी […]

Ahmednagar Bajar Samiti Letsupp

Ahmednagar Bajar Samiti Letsupp

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील १४ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाल संपल्याने बाजार समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. यासाठी २८ एप्रिल राेजी मतदान घेतले जाणार आहे.

अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणात मोठी अपडेट…

२७ मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू हाेणार आहे. राज्य निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डाॅ. पी. एल. खंडागळे यांनी तसे पत्रच जारी केले आहे.

जिल्ह्यातील बाजार समित्यांवर सध्या प्रशासक नेमलेला आहे. या निवडणुकीत ग्रामपंचायत, साेसायटी मतदार संघातून शेतकऱ्यांनाही उमेदवारीची संधी असणार आहे.

ठाकरे अन् फडणवीसांच्या भेटीनं शिंदे गट अस्वस्थ? मंत्री शंभुराज देसाई म्हणाले…

निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस ३ एप्रिल असणार आहे. अर्जाची छाननी ५ एप्रिल, तर वैध अर्जाची यादी ६ एप्रिल राेजी प्रसिद्ध हाेईल. २० मार्चपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे.

अंतिम उमेदवारांची यादी व चिन्ह वाटप २१ एप्रिल राेजी हाेईल. २८ एप्रिल राेजी मतदान हाेणार आहे. त्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी मतमाेजणी हाेणार आहे. यासंदर्भात उपनिबंधक गणेश पुरी निर्णय घेणार आहे.

Exit mobile version