Download App

Ahmednagar Crime: शिंदे गटाच्या नेत्यासह मुलावर अॅट्रासिटी

  • Written By: Last Updated:

अहमदनगर शहरातील केडगाव उपनगरात शनिवारी रात्री भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. त्यात दोन गटात वादावादी होऊन हाणामारी झाली आहे. याप्रकरणी गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

Atiq Ahmadचे नाशिक कनेक्शन : भावाने मरण्यापूर्वी ज्याचे नाव घेतले तो गुड्डू अटक

शिवसेनेचे (शिंदे गट) शहरप्रमुख दिलीप सातपुते व त्यांचा मुलगा ओंकार सातपुते याच्यासह सात जणांवर अॅट्रासिटीसह इतर कलमांनुसार गुन्हे दाखल झाले आहेत.

केडगाव येथे काल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.

अहमदनगरमधील व्यापाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या

ही मिरवणूक अहमदनगर-पुणे महामार्गावर आली असता दोन गटांमध्ये वाद झाला. राहुल सुनील उमाप यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जातीवाचक शिवीगाळ करत अक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दिलीप सातपुते, ओंकार सातपुते, ऋषभ शिंदे, विशाल शिरोळे, अरुण घुगे, अनिकेत शिर्के, आकाश पवार यांच्यावर घातक हत्यारांनी दुखापत, दंगा करणे, सामाजिक स्वास्थ बिघडविणे आदी स्वरुपाचे गुन्हे कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.

Tags

follow us