Download App

एटीएम फोडणारे चौघे अखेर गजाआड, नगर पोलिसांची मोठी कारवाई

  • Written By: Last Updated:

अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी शहरात एटीएम (ATM burst) फोडीची घटना घडली होती. या एटीएम फोडणार्‍या चार जणांच्या टोळीला गजाआड केले आहे. (Ahmednagar Four accused arested for breaking ATM)

९ जुलै रोजी बॅक ऑफ महाराष्ट्राचे शाखा प्रबंधक प्रशांत अशोक साळवे यांनी फिर्यादी दिली होती की, बॅक ऑफ महाराष्ट्र वाकोडी फाटा येथील एटीएमजवळ दोन अनोळखी इसम नंबरप्लेट नसलेल्या कारमध्ये (सिल्व्हर रंगाची स्विफ्ट कार) आले होते. त्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशिन कट करुन मशिनमधील पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या घटनेबाबत भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होतात पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी पोनि. दिनेश आहेर यांना गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.

लोकं लाळघोटे अन् धोकेबाज म्हणूनच मारलं, MD अन् CEO च्या हत्येआधी आरोपीची इन्स्टा स्टोरी… 

या घटनेच्या तपासाचे आदेश मिळताच पोनि. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची दोन पथके नेमली होती. या पथकाने बॅक ऑफ महाराष्ट्रामधील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर तपासाला सुरूवात केल्यानंतर राहुरी परिसरात एक सिल्व्हर रंगाची स्विफ्ट कार भरधाव वेगाने जाताना दिसली. पथकाने लागलीच संशयीत भरधाव कारची माहिती आहेर यांना दिली. ही माहिती मिळताच आहेर यांनी पथकास कारचा पाठलाग करण्यास सांगितले. तर दुसऱ्या पथकाला नगर मनमाड रोडने पाठवून कारचा शोध घेण्यास सांगितले. पथक एमआयडीसी, विळद परिसरात संशयीत वाहनाचा शोध घेताना सदर वाहन बायपास रोडने जाताना दिसले. पथकाने खातगांव टाकळी गावच्या शिवारात स्विफ्ट कार अडवली आणि दोन संशयीतांना ताब्यात घेतले.

अजित अरुण ठोसर ( वय 22, रा. मातकुळी, ता. आष्टी, जिल्हा बीड हल्ली रा. पंम्पींग स्टेशन, साईनगर, ता. संगमनेर), (जमीर जाफर पठाण वय 21, रा. खांडगांव, ता. संगमनेर) अशी संशयितांची नावे आहेत. दरम्यान, कारची झडती घेलती असता ऑक्सीजन सिलेंडर, भारतगॅस कंपनीची टाकी, पेंट स्प्रे, गॉगल, स्टील रॉड, निळे व लाल रंगाचा पाईप, रेग्युलेटर, नोझल, ऍ़डजस्टेबल पक्कड व ओप्पो कंपनीचा मोबाईल सापलडा. याबाबत विचारले असता संशियितांनी उडवा-उडवीची उत्तरे दिली. दरम्यान, त्यांना विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने विचारपुस केली असता त्यांनी त्यांचे साथीदार रविंद्र चव्हाण व शुभम मंजुळे (दोन्ही रा. खडकी, ता. कोपरगांव) यांचे सोबत मिळुन चोरी केल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्यांनाही बेड्या ठोकल्या आहेत.

Tags

follow us