लोकं लाळघोटे अन् धोकेबाज म्हणूनच मारलं, MD अन् CEO च्या हत्येआधी आरोपीची इन्स्टा स्टोरी…
“ग्रहावरील लोकं लाळघोटे अन् धोकेबाज म्हणूनच मारलं”, सोशल मीडियावर अशी स्टोरी बंगळुरात दुहेरी हत्याकांडांतील आरोपीने हत्या करण्यापूर्वी अपलोड केली होती. ही इन्स्टा स्टोरी अपलोड केल्यानंतरच आरोपीने कंपनीच्या MD आणि CEO ची हत्या केली असल्याचं उघड झालं आहे. दरम्यान, दुहेरी हत्याकांडातील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून मुख्य आरोपी हा टेक क्षेत्राशी संबंधित असून तो एक रॅपर असल्याचं उघड झालं आहे. दरम्यान, टेक क्षेत्रात कंपनीचे सीईओ आणि एमडी यांचा अडथळा येत असल्याने आरोपीने त्यांची तलवारीने वार करुन हत्या केल्याचं उघड झालं आहे. (Ex employee who killed md and ceo in office is rapper and posted message on instagram before killing)
Baipan Bhaari Deva सिनेमाचं महेश मांजरेकरांकडून तोंडभरुन कौतुक; म्हणाले, ‘मराठी सिनेमाला लोक…’
काल दुपारच्या सुमारास एरोनिक्स कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर फणींद्र सुब्रमण्यम आणि सीईओ वीनू कुमार कॅबिनमध्ये बसले होते. त्याचवेळी कंपनीचा माजी कर्मचारी आणि रॅपर फेलिक्स कार्यालयात तलवार घेऊन आत घुसला. समोर एमडी आणि सीईओ बसल्याचं पाहताच त्याने दोघांवरही हल्ला करीत हत्या केली. या घटनेनंतर दोघांनाही रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, त्याआधीच दोघांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, या कंपनीची सुरुवात 2022 साली एमडी फणींद्र सुब्रमण्यम आणि सीईओ वीनू कुमार यांनी केली होती. बनेरघट्टा य़ेथील एका कंपनीतून राजीनामा देऊन त्यांनी आपली नविन कंपनी सुरु केली होती. फेलिक्सची कंपनी आर्थिक अडचणींमधून जात होती. फणींद्र आणि वीनूमुळे उद्योगातील ग्राहक गमावतं असल्याचं फेलिक्सला वाटलं होतं. त्यामुळेच त्याने हत्या केल्याचं उघड झालंय.
सचिन, द्रविड माझ्याकडे उणीवा घेऊन यायचे, गेल्या दहा वर्षात कोणीच नाही आलं, गावसकरांचा संताप
पोलिसांच्या माहितीनूसार, आरोपी जे फेलिक्स उर्फ जोकर टिकटॉक स्टार असून टिकटॉकनंतर तो इंस्टाग्रामवर सक्रिय झाला. त्याचे हजोरो फॉलोवर्स देखील आहेत. फेलिक्सने एरोनिक्स सोडून आपली दुसरी कंपनी स्थापन केली होती. जेव्हा पोलिस आरोपींचा शोध घेत होते, तेव्हा मुख्य संशयित शबरीश उर्फ जोकर फेलिक्स समाज माध्यमांवर फोटो टाकण्यात व्यस्त होता. या दुहेरी हत्याकांडानंतर काही तासांनी, फेलिक्स याने हत्येत सामील असल्याबद्दल एक टीव्ही स्क्रीनशॉट टाकला.
विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी सोनिया गांधी मैदानात, बंगळुरूच्या बैठकीला 24 पक्ष एकवटणार
इंस्टाग्रामवर टाकली होती स्टोरी :
हत्येच्या आधी त्याने एक गुपित संदेश देखील दिला होता. ज्यामध्ये त्याने लिहिलं होतं की, “या ग्रहावरील लोक लाळघोटे आणि धोकेबाज आहेत. त्यामुळे मी या ग्रहावरील लोकांना मारलंय. मी फक्त वाईट लोकांना इजा पोहोचवतो. मी कधीही चांगल्या माणसाला इजा नाही केली.” अशी स्टोरी त्याने टाकली होती.
कर्मचाऱ्यांनी सांगितली थरारक घटना :
आरोपी फेलिक्स उर्फ शबरीश आणि त्याचे दोन मित्र, दुपारच्या सुमारास कंपनीत दाखल झाले होते. त्यांनी कंपनीच्या एमडी आणि सीईओंबद्दल विचारपूस केली होती. त्यानंतर त्यांनी दोघांचीही वाट पाहिली. फणींद्र आणि वीनू आल्यानंतर ते सर्व पहिल्या मजल्यावरील एमडींच्या कॅबिनमध्ये गेले. 20 मिनिटांच्या चर्चेनंतर कॅबिनमधून ओरडण्याता आवाज आला आणि खाली पळालो. उघडलेल्या दरवाज्यातून आम्ही पाहिलं की तीन लोक वीनू आणि फणींद्रवर चाकूने हल्ला करतायेत. आम्ही हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, पण फेलिक्स आणि त्याच्या दोन मित्रांनी आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिली, असल्याचं कर्माचाऱ्यांनी सांगितलं आहे.