Download App

Ahmednagar : बाजार समितीसाठी शेवटच्या दिवशी दिग्गजांचे अर्ज, मातब्बरांमुळे निवडणूक लक्षवेधी ठरणार

अहमदनगर : नगर तालुका बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक दिग्गजांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मातब्बर उमेदवारांमुळे बाजार समितीची निवडणूक लक्षवेधी ठरणार असल्याचे चित्र तालुक्यामध्ये दिसून येत आहे. 18 जागांसाठी शंभरपेक्षा अधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. निवडणुकीसाठी शेकडो अर्ज दाखल झाल्याने अर्ज माघारी घेण्याच्या वेळी नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे.

साताऱ्यात दोघांचा कोरोनाने मृत्यू! जिल्हा प्रशासनाकडून मास्क वापरण्याचे आदेश…

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सुप्रिया अमोल कोतकर, संदीप कर्डिले, रोहिदास कर्डिले, अंकूश शेळके, सभापती अभिलाष घिगे, संतोष म्हस्के, रेवणनाथ चोभे, उद्योजक अजय लामखडे यांच्यासह तालुक्यातील अनेक दिग्गजांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. कोणी कोणत्या गटाकडून अर्ज दाखल केला आहे हे अर्ज माघारीच्या दिवशीच स्पष्ट होईल. मात्र, दिग्गज निवडणुकीत उतरल्याने निवडणूक लक्षवेधी होण्याचे चिन्हे आहेत. नगर बाजार समितीच्या 18 जागांसाठी २८ रोजी निवडणूक होणार आहे.

संभाजी ब्रिगेडला महाविकास आघाडीची साथ, आगामी निवडणुका सोबत लढणार

आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने तालुका उपनिबंधकाच्या कार्यालयात आज अर्ज दाखल करण्यासाठी अक्षरशः झुंबड उडाली होती. शेतकऱ्यांना प्रथमच बाजार समितीचा संचालक होण्याचा बहुमान मिळणार असल्याने शेतकरी म्हणूनही अनेकांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. बाजार समितीत गेल्या 15 वर्षांपासून माजी मंत्री शिवाजी कर्डिले, माजी सभापती भानुदास कोतकर यांची सत्ता आहे. कर्डिले-कोतकर यांना शह देण्यासाठी यंदा नगर तालुका महाविकास आघाडीने जिल्हा परिषद सदस्यांना रिंगणात उतरवले आहे. जिल्हा परिषद सदस्यांना बाजार समितीच्या निवडणुकीत उतरविल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे.

एमयुटीपी प्रकल्पांसाठी राज्य सरकार पूर्ण सहकार्य करणार, मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सभापती अभिलाष घिगे, संतोष म्हस्के, रेवणनाथ चोभे, रेश्माताई चोभे, दीपक कार्ले, सुधीर भापकर, अशोक झरेकर, विलास शिंदे, रभाजी सुळ, दत्ता तापकीर, मंगलदास घोरपडे, उद्योजक अजय लामखडे, बाबा खर्से, भाऊसाहेब बोठे, सनी लांडगे, गुलाब शिंदे, राजू आंधळे, सत्यभामा कुलट, उद्धव दुसुंगे, रामदास सोनवणे, विजय शेवाळे, गोरख काळे, संजय जपकर, दिलीप भालसिंग, नंदकिशोर शिकारे, संजय गिरवले, विशाल निमसे, बहिरू कोतकर आदींसह अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. 18 जागांसाठी शंभरपेक्षा अधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

SSC HSC Exam Result : दहावी आणि बारावीचे निकाल कधी होणार जाहीर? समोर आली महत्त्वाची तारीख

माजी मंत्री कर्डिले यांच्या विरोधात महाविकास आघाडी अशीच लढत या निवडणुकीत पाहावयास मिळणार आहे. कर्डिले यांच्या मदतीला खासदार विखे पाटील यांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. तर महाविकास आघाडीच्या बाजूने आमदार निलेश लंके, आमदार प्राजक्त तनपुरे, ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांची ही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

दरम्यान, महिनाभर चालणाऱ्या निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोप पाहावयास मिळणार आहेत.. एकंदरीत मातब्बर उमेदवारांमुळे नगर बाजार समितीची निवडणूक ही लक्षवेधी होणार असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.

Tags

follow us