संभाजी ब्रिगेडला महाविकास आघाडीची साथ, आगामी निवडणुका सोबत लढणार
अहमदनगर : आगामी सर्व निवडणुका या संभाजी ब्रिगेड महाविकास आघाडी सोबत युती करून लढणार आहे. सध्या देशामध्ये महागाई ,बेरोजगारी यासह जी काही वाटचाल चालू आहे. ती या देशाला घातक आहे, एक प्रकारे देशांमध्ये हुकूमशाही वाढत चाललेले आहे जर अशीच परिस्थिती राहिली तर हिंदुस्तान हा पाकिस्तान व श्रीलंका झाल्याशिवाय राहणार नाही. असा घनघाती आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुसे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
संभाजी ब्रिगेडने शिवसेनेसोबत युती केली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या कोट्यातील जागा संभाजी ब्रिगेडला दिल्या जातील. त्यामुळे शिवसेना संभाजी ब्रिगेडला किती जागा देते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
यामुळे आता जिल्ह्यातील राजकारणात महाविकास आघाडीची ताकत वाढताना दिसेल, आता हे पाहून महत्वाचं असेल की जिल्ह्यामध्ये भाजप महाविकास आघाडीचा कसा सामना करेल.
PM Modi : ‘ते’ ताकदवान पण कारवाई थांबवू नका, पंतप्रधान मोदींचं सीबीआयला पाठबळ
दरम्यान नगर जिल्ह्यामध्ये पक्षाच्या वतीने नगर दक्षिण करता राजेश परकाळे व उत्तर नगर करता शिवाजी पवार यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड जाहीर करण्यात आली.
यावेळी पक्षाचे संघटक सचिव डॉक्टर संदीप कडलक, अभियंता विजयकुमार ठुबे ,प्राध्यापक पोपटराव काळे, मच्छिंद्र गुंड, जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे व शिवाजी पवार आदिलसह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.