Ahmednagar News : डॉ. नागरगोजे जिल्ह्याचे नवे जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. सांगळेंची पुण्याला बदली

सध्या राज्यात बदल्यांचे सत्र सुरु आहे. अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या या सुरु आहेत. यातच नगरमध्ये देखील काही महत्वाच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संदीप सांगळे यांची पुण्याला आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात प्राचार्यपदी बदली झाली आहे. Video : अजितदादांची एन्ट्री राजीनाम्याची चर्चा, चेहऱ्यावर टेन्शन अन् शिंदे हसत म्हणाले आमदार… […]

Health Officer Ahmednagar

Health Officer Ahmednagar

सध्या राज्यात बदल्यांचे सत्र सुरु आहे. अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या या सुरु आहेत. यातच नगरमध्ये देखील काही महत्वाच्या बदल्या झाल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संदीप सांगळे यांची पुण्याला आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात प्राचार्यपदी बदली झाली आहे.

Video : अजितदादांची एन्ट्री राजीनाम्याची चर्चा, चेहऱ्यावर टेन्शन अन् शिंदे हसत म्हणाले आमदार…

दरम्यान, आता त्यांच्या जागी नाशिक मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. बापूसाहेब नागरगोजे यांची नगरला जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे. दरम्यान, नव्याने बदलून येणारे डाॅ. नागरगोजे यांनी पूर्वी नगरलाच अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून काम पाहिलेले आहे.

Ahemadnagar News : सासरेबुवांनी धरली अजितदादांची वाट, तर जावयांचे पत्ते अद्याप गुलदस्त्यात…

सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या या सुरु केल्या आहेत. याचाच भाग म्हणून नगरमधील डाॅ. सांगळे यांची देखील बदलीचे आदेश निघाले. सांगळे यांनी यापूर्वी बीड येथे जिल्हा आरोग्य अधिकारी, तसेच जागतिक आरोग्य संघटनेतही उत्कृष्ट काम केले आहे.

‘तो’ प्रश्न मनात आला अन् आज साहेबांसोबत ठाम, अमोल कोल्हेंनी ठणकावून सांगितलं…

डॉ. सांगळे हे गेल्या पाच वर्षांपासून नगरला जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत होते. यात त्यांनी कोरोना काळात उल्लेखनीय काम केले. प्रारंभी कोरोना रुग्णांच्या बेडची व्यवस्था, ॲाक्सिजन पुरवठ्यापासून रुग्णांच्या चाचण्या, तसेच औषधोपचार यात त्यांनी सर्व आरोग्य यंत्रणेला बरोबर घेऊन काम केले. त्यानंतर कोरोना लसीकरणाचेही उत्कृष्ट नियोजन करून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण घडवून आणले.

सांगळेंची उल्लेखनीय कामगिरी :

डॉ. सांगळे यांनी त्यांच्या कार्यकीर्दीत अनेक उल्लेखनीय कार्य केले. तसेच पदोन्नतीसह आरोग्य कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न सोडण्यासाठी त्यांनी स्वतः मेहनत घेतली आहे. नवीन झालेल्या जिल्ह्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रांना त्यांनी सामाजिक संस्थांच्या मदतीने आरोग्य साहित्य मिळवून दिले. जिल्हास्तरावरून आता विभागीय स्तरावर त्यांना कामाची संधी मिळणार आहे.

Exit mobile version