अजितदादांचा शब्द, ‘सभागृहात आवाज उठवणार’; शेतकऱ्यांना मदतीची अपेक्षा

अहमदनगर : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी उद्या सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार असं वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी अहमदनगर येथे केले आहे. सध्या मुंबईत राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) सुरु आहे. चार दिवसांच्या सुट्टीनंतर उद्यापासून पुन्हा अधिवेशनाला सुरुवात होतीय. […]

Untitled Design (5)

Untitled Design (5)

अहमदनगर : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी उद्या सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार असं वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी अहमदनगर येथे केले आहे. सध्या मुंबईत राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget session) सुरु आहे. चार दिवसांच्या सुट्टीनंतर उद्यापासून पुन्हा अधिवेशनाला सुरुवात होतीय.

अजित पवार म्हणाले, अवकाळी पावसामुळे निफाड आणि इतर भागात मोठ नुकसान झालं आहे. गहू, द्राक्ष, हरभरा, कापूस, कांदा ही रब्बीची पीकं अडचणीत आली आहेत. या संदर्भात उद्या सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार आहे, असे अजित पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले.

Ravindra Dhangekar : विजयानंतर पवारांनी धंगेकरांना काय सांगितले?

राज्यात धुलिवंदनाचा सण साजरा केला जात असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला आहे. अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा, द्राक्ष आणि गव्हाचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच आंबा, काजू या पिकांना देखील फटका बसला आहे. झाडांना आलेला मोहर आणि तयार झालेली फळं गळायला सुरुवात झालीय.

जळगावमध्ये अवकाळी पावसामुळे तर धुळ्यात गारपीटीने शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्याने केळी, गहू, हरभरा, मका या पिकांचे प्रचंड नुकसान झालं आहे. राज्यात अवकाळीमुळे अनेक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. आता उद्या अधिवेशनात विरोधी पक्षांची भूमिका असणार आहे? हे पाहावं लागणार आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकार काही मदत जाहीर करतंय का? हे देखील पाहावं लागणार आहे.

Exit mobile version