Ravindra Dhangekar : विजयानंतर पवारांनी धंगेकरांना काय सांगितले?

Ravindra Dhangekar : विजयानंतर पवारांनी धंगेकरांना काय सांगितले?

पुणे :  कसबा( Kasaba )   पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar ) यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा ११ हजार ४० मतांनी पराभव केला आहे. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी देखील धंगेकर यांच्यासाठी प्रचारसभा घेतली होती. धंगेकर हे विजयी झाल्यानंतर त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. याभेटीत पवारांनी धंगेकरांना काय सांगितले, हे स्वत धंगेकर यांनी सांगितले आहे.

Sanjay Raut : पोलिसांच्या आडून हल्ले करू नका, मर्द असाल तर..; राऊतांनी थेट मुख्यमत्र्यांनाच ललकारले

शरद पवार साहेब हे देशाचे नेते आहेत. मी उमेदवारी अर्ज भरल्यावर ते स्वत प्रचारासाठी आले. त्यांनी तीन-चार सभा घेतल्या. त्यांच्या सभेमुळे कसबा विधानसभेत त्यांना मानणारा जो वर्ग आहे तो ताकदीने माझ्या मागे उभा राहिला. माझ्या विजयात त्यांचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्राचे ते सह्याद्री आहेत, असे धंगेकर म्हणाले आहेत.

पवार साहेब हे मोठे नेते आहेत. त्यांचे दोन शब्द देखील लाख मोलाचे असतात. त्यांचे दोन शब्द देखील आत्मसात केले तरी त्यातून बरेच शिकण्यासारखे असते, असे धंगेकर म्हणाले आहेत. यावेळी त्यांनी कसबा विधानसभा क्षेत्रातील विविध समस्या या सभागृहात मांडणार असे सांगितले आहे.

राबडीदेवीनंतर आज लालूंचा नंबर, लॅण्ड फॉर जॉब घोटाळ्यात सीबीआय करणार चौकशी

दरम्यान रवींद्र धंगेकर यांनी भाजपचा गड असलेल्या कसबा विधानसभा क्षेत्रात विजय मिळवला आहे. कसबा विधानसभा मतदारसंघ हा गेली २५ वर्षांपेक्षा अधिक काळ भाजपकडे होता. याठिकाणी धंगेकर यांनी विजय मिळवला आहे. यानंतर राज्यात बदलाचे वारे वाहायला लागले आहेत, असे विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube