Download App

लव्ह जिहाद अन् औरंगजेबाचे उदात्तीकरण; हिंदू धर्मीयांना स्वरक्षणासाठी शस्त्र वापरण्याची परवानगी द्या!

देशभरात हिंदु समाजावर हल्ले होत असल्याने हिंदुंना स्वरक्षणासाठी शस्त्रे वापरण्याची परवानगी देण्याच्या मागणी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आलीय. हिंदुत्ववादी संघटना बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषदेकडून या मागणी निवेदन देण्यात आले आहे.

पुणे महानगरपालिका निवडणूक प्रमुखपदी प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे यांची नियुक्ती…

हिंदुत्ववादी संघटनांकडून दिलेल्या निवेदनात म्हटलं की, सध्या देशभरात हिंदू जनतेवर हल्ले होत आहेत. लव्हजिहादची प्रकरणे उघडकीस येत आहेत. तसेच लव्ह जिहाद करुन हिंदू मुलींच्या हत्या करण्यात येत आहेत. सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्याचे प्रकार घडत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्यात येत आहेत.

राज्यात मध्यावधीची चाहूल; विधानसभेसाठी भाजपच्या शिलेदारांची फौज तयार, नावे जाहीर!

या संपूर्ण प्रकारांमुळे हिंदु समाजावर हल्ले घडण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळेच हिंदुंना स्वरक्षणासाठी शस्त्र वाटप करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलीय.

दहावी, बारावी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी; वनरक्षक पदाच्या 2138 जागांसाठी भरती

त्याचप्रमाणे सध्या देशात जिहादी कारवाया करून जे षडयंत्र सुरू आहे त्याची सखोल चौकशी करावी. नगर शहरातील मुकुंदनगर भागात औरंगजेबाचे पोस्टर घेऊन नाच करणाऱ्या तरुणांवर गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी निवेदन देताना बजरंग दलाचे कुणाल भंडारी, विश्व हिंदू परिषदेचे विजयकुमार पादिर, गजेंद्र सोनवणे,मुकुल गंधे, श्रीकांत नंदापुरकर, मनोहर भाकरे, दिग्विजय बसापुरे, ऋषिकेश उदमले आदी उपस्थित होते.

Tags

follow us